शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

Kanya Rashi Bhavishya 2022: कन्या रास वार्षिक राशीभविष्य: वर्षाची सुरुवात दमदार, बजेटबाबत राहा सावधान; नोकरदारांना उत्तम काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 10:38 AM

Kanya Rashifal 2022: सन २०२२ हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अनेक बदल घेऊन येणारे ठरेल. आर्थिक आघाडी, कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी कसे असेल आगामी वर्ष? जाणून घेऊया...

सन २०२२ हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अनेक बदल घेऊन येणारे ठरेल. काय असतील ते बदल? चांगले असतील की अडचणी वाढवणारे असतील? चला जाणून घेऊया...

कन्या राशीसाठी हे वर्ष सामान्यपेक्षा चांगले जाणार आहे.  या वर्षाच्या मध्यात म्हणजे एप्रिलच्या महिन्यात गुरूच्या राशी संक्रमणामुळे, तुम्हाला तुमची कारकीर्द, आर्थिक, कौटुंबिक, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात संमिश्र परिणाम मिळतील, परंतु असे असले तरी, अधिक चांगल्या परिणामांसाठी वर्षभर काळजी घ्यावी आणि सावधगिरी बाळगून कार्यरत राहावे, असा सल्ला दिला जात आहे. एप्रिलच्या मध्यानंतर राहुच्या राशीबदलामुळे प्रेमात पडलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात काही समस्या येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विवाहितांसाठी हे वर्ष संमिश्र असणार आहे.

कन्या राशीच्या लोकांच्या आर्थिक आघाडीविषयी बोलायचे झाले तर सन २०२२ हे वर्ष तुम्हाला पैशांशी संबंधित अनेक आर्थिक अडचणीचे ठरू शकेल. विशेषत: या वर्षी तुम्हाला अवाजवी खर्च टाळावा लागेल. तथापि, वर्षाचा सुरुवातीचा महिना म्हणजे जानेवारी महिना तुमच्यासाठी चांगला राहील. कारण या काळात मंगळाचे गोचर धन, संपत्ती आणि सुखाच्या चौथ्या स्थानी असेल. त्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. यानंतर, फेब्रुवारी महिन्यातही, तुम्ही अनेक वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमवू शकाल. कारण, या काळात तुमच्या धनाच्या दुसऱ्या स्थानाचा स्वामी शुक्र मकर राशीत प्रवेश करेल आणि त्याच वेळी तो तुमचे उत्पन्न आणि लाभ वाढू शकतील.

परंतु या काळात अनेक खर्चाचा बोजा आर्थिक संकटही निर्माण करणारा ठरू शकतो. जे लोक कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत होते त्यांनी या काळात असे करणे टाळावे. तथापि, असे करणे आवश्यक असल्यास, तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच आपले पैसे गुंतवा. या व्यतिरिक्त मार्च महिन्याच्या सुरुवात तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल, तर एप्रिलच्या मध्यानंतर, जेव्हा गुरु तुमच्या कर्ज स्थानातून बाहेर पडेल आणि सहभागाच्या सातव्या भावात बसेल, तेव्हा तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त आहे. हा कालावधी तुमच्या गुंतवणुकीसाठी देखील अनुकूल असेल. विशेषत: नोकरदार लोक त्यांच्या मेहनतीने या वर्षी काही नवीन स्त्रोतांमधून त्यांचे उत्पन्न वाढवू शकतील. या वर्षीही तुमच्या करिअरमध्ये अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. विशेषत: मंगळाच्या भ्रमणादरम्यान नोकरदार आणि व्यावसायिक दोघांनाही मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक जीवनात वर्षाच्या सुरुवातीला अनुकूल योग तयार होतील, परंतु असे असूनही सर्व प्रकारच्या फालतू खर्चापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दुसरीकडे, जर तुम्ही विद्यार्थी असाल तर पहिले काही महिने सोडले, तर उर्वरित महिने तुम्हाला यावर्षी यश मिळवून देणार आहेत. कौटुंबिक जीवनातही गोष्टी सामान्य राहतील. परंतु तुमच्या राशीवर शनी देवाच्या विशेष प्रभावामुळे या वर्षी तुम्ही अनेक कौटुंबिक समस्यांनी घेरलेले राहू शकाल. तसेच, हे वर्ष तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने सामान्य परिणाम देईल. विशेषत: सुरुवातीच्या आणि मधल्या काळात तुम्हाला काही आरोग्य समस्यांमुळे त्रास होऊ शकतो.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य