कन्या राशीचे लोक धूर्त आणि स्वार्थी असतात. संधीचा फायदा कसा घ्यावा आणि संधीचे सोने कसे करावे हे त्यांच्याकडून शिकावे. ते समोरच्याबद्दल मनात चटकन मत बनवतात. दुसऱ्यांचे बोलणे पूर्णपणे ऐकून न घेता आपणच अनुमान काढून वाद विवाद उकरून काढतात. मात्र आपले चुकतेय किंवा वाद जास्त ताणला जातोय हे कळल्यावर ते माफी मागण्यात कमीपणा वाटून घेत नाहीत. त्यांना गोड खायला आणि गोड बोलायला फार आवडते. आपला स्वार्थ साधण्यासाठी ते कुणाशीही गोड बोलू शकतात.
क्षणात राग आणि क्षणात आनंदी : कन्या राशीचे लोक म्हणजे सौम्य स्वभावाचे, साधे राहणीमान असलेले पण क्षणात राग येणारे आणि क्षणात शांत होणारे लोक असतात. दिसायला सुंदर असतात. हुशार असतात. नीटनेटकेपणा त्यांच्या अंगात असतो. यांचा मूड कधी कसा असेल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकणार नाहीत. कन्या अर्थात स्त्री आणि हेच त्यांचे राशी चिन्ह असते, त्यानुसार कन्येच्या स्वभावाचा जसा थांगपत्ता लागत नाही, तसा कन्या राशीच्या लोकांचाही स्वभावाचा थांग पत्ता लागू शकत नाही. प्रवाहाप्रमाणे वागणारे हे लोक घटकेत आपली भूमिका बदलू शकतात.
Leo Features: राजेशाही थाट, नेतृत्त्वाचे गुण आणि स्वभावात करडेपणा; असे असतात सिंह राशीचे लोक!
कन्या राशीच्या महिला : कन्या रास महिलांना जास्त लाभदायक ठरते. स्त्रीसुलभ भावना आणि राशीचे गुण यांची सरमिसळ होऊन त्या उत्तम संसार करतात. नात्यांना चांगले सांभाळतात. त्यांच्यात विविध कला असतात. त्या आपल्या स्वभावाने सर्वांचे मन जिंकून घेतात. याउलट कन्या राशीचे पुरुष या राशीच्या गुणामुळे संशयी आणि हळवे असतात. आपल्या जोडीदाराबद्दल सजग असतात. कधी कधी अति संशयामुळे किंवा अति संवेदनशील झाल्यामुळे नात्यात दरी निर्माण होते. म्हणून त्यांनी आपल्या भावनांना आवर घालायला हवा.
व्यवस्थापन : या राशीच्या लोकांमध्ये नियोजनाची उत्तम कला असते. या कलेमुळे त्यांची भविष्याची आखणी अचूक ठरते. हे लोक इव्हेन्ट मॅनेजमेंट तसेच खाद्योद्योगात यशस्वी होऊ शकतात. उत्साही स्वभाव आणि रसिकता यामुळे त्यांचे नियोजन कल्पक असते. हे लोक मूळचे खवय्ये असल्यामुळे ते दुसऱ्यांनाही चांगले चुंगले खाऊ घालण्यास उत्सुक असतात. अशा लोकांबरोबर मैत्री असणाऱ्या लोकांची कधीच आबाळ होत नाही.
हे लोक बुद्धिमान असतात : पैसे कमवणे आणि जमवणे याबाबत त्यांच्याकडे नवनव्या कल्पना असतात. हुशार असल्यामुळे त्यांना विविध विषयात रस असतो. मात्र अनेकदा स्वार्थ साधण्याच्या हेतूपायी ते हितशत्रूंना ओळखण्यात कमी पडतात आणि घाईघाईत चुकीचे पाऊल उचलतात. अशा निर्णयांचा त्यांना पश्चात्ताप होतो आणि त्यांचा लोकांवरून विश्वास उडतो. या लोकांनी थंड आणि शांत डोक्याने निर्णय घेतले तर त्यांना पुढे जाण्यावाचून कोणीही अडवू शकणार नाही.
समजावून सांगण्याची प्रभावी पद्धत : कोणतेही काम तर्कशुद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची सवय असल्यामुळे ते स्वतः विचारांच्या गुंत्यात अडकत नाहीत. उलट ते इतरांचा वैचारिक गुंता सोडवायला मदत करतात. त्यांनी आपली स्वार्थी वृत्ती बाजूला ठेवून इतरांना मदत केली तर दुसऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो.