शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

संतान प्राप्तीसाठी केले जाते अचला सप्तमीचे व्रत; जाणून घ्या मुहूर्त, व्रत आणि कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 4:36 PM

ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा असते, त्यांनी हे व्रत केले असता त्यांनाही तेजस्वी व गुणी बालकाचे वरदान मिळते, असे म्हटले जाते. 

माघ मासातील शुक्ल सप्तमीला अचला सप्तमी म्हणतात. हीच तिथी आपण रथसप्तमी या नावाने साजरी करतो. याशिवाय अचला सप्तमीला सूर्य सप्तमी तसेच आरोग्य सप्तमी असेही म्हणतात. यावर्षी १९ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी अचला सप्तमी आहे. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. हे व्रत केल्यामुळे धन, संपदा आणि संतान प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

पौराणिक कथेनुसार या दिवशी कश्यप ऋषी व त्यांची पत्नी अदिती यांच्या उदरी सूर्याचा जन्म झाला. हे बालक प्रखर तेजस्वी होते. त्याच्या जन्मामुळे सर्वत्र प्रकाशाचे साम्राज्य पसरले. म्हणून हा दिवस सूर्याची जयंती म्हणूनही साजरा केला जातो. ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा असते, त्यांनी हे व्रत केले असता त्यांनाही तेजस्वी व गुणी बालकाचे वरदान मिळते, असे म्हटले जाते. 

अचला सप्तमीचा व्रत :  व्रतकर्त्याने आदल्या दिवशी म्हणजे षष्ठीला एकभुक्त अर्थात एक वेळ जेवून राहावे. सप्तमीला पहाटेच शुचिर्भूत व्हावे. नंतर शक्य असेल त्या धातूचा दिवा लावावा. सूर्याचे ध्यान करून तो दिवा वाहत्या पाण्यात सोडावा. या विधीनंतर स्वत:च्या घराच्या अंगणात रक्तचंदनाचे गंध उगाळून त्या गंधाने सारथी अरुणासह सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याचे चित्र काढावे. त्या चित्राचे 'ध्येय: सदा सवितृमंडल मध्यवर्ती' या मंत्राने ध्यान करावे. नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी. शेणीच्या विस्तवावर मातीच्या पात्रात केलेल्या खिरीचा नैवेद्य सूर्यप्रतिमेला दाखवावा. शेवटी सात रुईची पाने, सात प्रकारचे धान्य, सात बोरे वाहून अष्टांग अर्घ्य द्यावे. ब्राह्मणभोजन घालावे. स्त्रिायांनी संध्याकाळी हळदीकुंकू समारंभ करावा. दुर्धर व्याधींपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत रूढ झाले. 

अचला सप्तमीचा शुभ मुहूर्त: १८ फेब्रुवारी रोजी गुरुवारी ८ वाजून १७ मीनिटांनी सप्तमी तिथी सुरू होईल. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजून ५८ मीनिटांपर्यंत ही तिथी असेल. 

अचला सप्तमीची प्रचलित कथा : इंदुमती नावाची एक गणिका होती.  ती स्वत:चा उद्धार करून घेण्यासाठी वशिष्ठ नावाच्या ऋषिंकडे आली. त्यांनी तिला अचला सप्तमीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. तिने त्या व्रताचे आचरण केले. त्यामुळे तिचा उद्धार झाला. तसेच आणखी एका कथेनुसार कृष्णपूत्र शाम्ब अतिशय बलवान होता. त्याला त्याच्या शक्तीचा अभिमान होता. अशाच भावनेतून त्याने एकदा दुर्वास ऋषींचा अपमान केला. दुर्वास ऋषींनी त्याला शाप दिला. शाम्बचे गर्वहरण झाले, परंतु ऋषींच्या शापामुळे त्याला कुष्ठरोग झाला. या रोगातून बरे होण्यासाठी त्याने दुर्वास ऋषींकडे उ:शाप मागितला. ऋषिंनी त्याला क्षमा दिली आणि सूर्याची उपासना करायला सांगितली. तसेच अचला सप्तमीचे व्रत करायला सांगितले. या व्रताचरणामुळे शाम्ब कुष्ठरोगातून मुक्त झाला. म्हणून या सप्तमीला आरोग्य सप्तमी म्हणूनही ओळखतात.