अवघ्या जगामध्ये भरतवर्षाला सर्वोच्च स्थानावर पोहोचण्यासाठी ज्या भारतीय नररत्नांनी कर्म, वाणी व निश्चयाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्यामध्ये विदर्भातील एक महत्त्वाचे नररत्न म्हणजे वं. राष्ट्र्संत तुकडोजी महाराज होय. आपल्या मन, कर्म व वचन याद्वारा त्यांनी देश प्रगतीपथावर राहण्यासाठी ग्रामगीतेद्वारे त्यांनी ग्रामविकासाचा एक अलौकिक संदेश भारतीय समाजमनाला दिलेला आहे. आपल्या दिव्य भजनरचनांच्या स्फुर्तिने भारतीय युवक व सैनिकांना मौलिक राष्ट्रवादाचा संदेश त्यांनी दिला आहे. भारताला शानदार होण्यासाठी राष्ट्रसंतांनी राष्ट्रवंदनेतून जो विकासात्मक आशावाद व्यक्त केलेला तो असा-
तन मन धन से सदा सुखी हो। भारत देश हमारा ।
सभी धर्म अरू पंथ पक्ष को । दिलसे रहे पियारा ।।1।।
विजयी हो विजयी हो । भारत देश हमारा” ।
माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट ते वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हा त्यांचा जीवनप्रवास सर्व भारतीयांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांनी राष्ट्रप्रेरणा व जागृतीसाठी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रीय सामाजिक व धार्मिक कार्यासाठी झोकून दिले. देशकार्याची मशाल पेटवून त्यांनी स्वतःला 1942 च्या स्वातंत्र्य संग्रामात झोकून दिले. अनेक राष्ट्रीय संस्थांना भेटी देवून त्यांनी - जाग उठो बालबिरो तुम । अब तुम्हारी बारी है। हा युवकांना महत्त्वाचा राष्ट्रीय संदेश देवून त्यांचा प्रशिक्षण वर्ग घेतला. राष्ट्रधर्माला ग्लानी आल्यामुळे युवक वर्गामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रसंतांनी प्रभावी भाषण व देशभक्तीच्या भजनरचनेद्वारा प्रखरराष्ट्रीयतेचा दिव्य संदेश दिलेला आहे.
झाडझडुले शस्त्र बनंगे । भक्त बनेंगी सेना ।
पत्थर सारे बॉंम्ब बनेंगे । नाव लगेगी किनारे ।।
1
राष्ट्रधर्म, देशभक्ती, मानवता, विश्वशांती, जीवनमूल्ये, सिपाही
भारतीय जनतेस ब्रिटीश सत्तेविरूद्ध पेटून उठण्याचा संदेश त्यांनी केला. या जुलमी सत्तेविरूद्ध लढा देण्यासाठी त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या मनात एक प्रखर राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्ज्वलीत केली. त्यामुळेच त्यांना इंग्रज सरकारने नागपूर, रायपूर तुरूंगात चार महिने डांबले. तुरूंगातून बाहेर येताच त्यांनी 1946 मध्ये वरखेड येथे मेंदरापासून अस्पृष्यांना मंदिर प्रवेशाची लाट उठविली. भारतामध्ये जनता दुष्काळी परिस्थितीने होरपळून निघत असतांना जनतेमध्ये मानवता जागविण्याचे महत्त्वाचे कार्य केले. 1947 मध्ये ब्रिटिशांना निर्वाणीचा इशारा देतांना ते म्हणतात-
चेत रहा है भारत दुख से। आग बुझाना मुश्किल है।
उठा तिरंगा बढावे छाती । अब बहलाना मुश्किल है।।
राष्ट्रउभारणीमध्ये युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण मानून त्यासाठी युवकांनी बलवान, राष्ट्रभक्त व नितीमान होण्यासाठी चहा, चिवडा व चिरूटाचे दास न होता शिक्षणासोबतच शिलवान होण्याचा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला. गावचा पुढारी हा फक्त गावचा पुढारीच नाही तर राष्ट्राचे भवितव्य घडवित असतो. म्हणून तरूण मतदारांनी जागृत राहावे. युवकांनी प्रारब्धवादी न बनता निश्चयीव प्रयत्नवादी बनावे असा वर ते परमेश्वराला मागतात.
हा जातीभेद विसरूनिया एक हो आम्ही ।
अस्पृष्यता समुळ नष्ट हो जगातूनी ।।
खळ निंदका मनीही सत्य न्याय वसू दे।
दे वरची असा दे।
राष्ट्रसंतांच्या रोमारोमात राष्ट्रभक्ती भरलेली आहे. त्यांचा राष्ट्राभिमानही किती उच्च पातळीवरचा होता हे त्यांच्या असंख्य़ भजनांवरून विदीत होते. ग्रामविकासातून राष्ट्रउभारणीची अभिनव संकल्पना त्यांनी मांडली. गाव जगला, गावाचे भरण पोषण योग्य झाले तरच राष्ट्रउभारणी योग्य पद्धतीने होऊ शकते. राष्ट्रसंतांचा हा विचार सर्वसामन्य माणसाला जगविणारा असून, खेड्यातील दारिद्र, उपासमार, गरिबी संपून सर्वत्र स्वावलंबन, स्वयंपूर्णता आली पाहीजे. गावातील लोकांना रोजगार गावातच मिळावा. गावातील पैसा गावातच राहीला पाहीजे असा ग्राम स्वयंपूर्णतेचा विचार त्यांचा होता. ग्रामविकासासाठी सर्वांनी एकत्र झटले पाहिजे मेहनत, परिश्रम करून स्वतःच्या विकासाचा मार्ग स्वतःच शोधावा. त्यामुऴे गांव खेडे विकसित होवून देश स्वयंपूर्ण बनेल . भारत सर्व जगामध्ये शानदार होऊन आपल्या अलौकिक तेजाने तळपत राहील अशी ग्रामनिर्माण कला राष्ट्रसंतानी भारतीय खेड्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
2
गावागावासी जागवा । भेदभाव हा समुळ मिटवा
उजळा ग्रामोन्नतीचा दिवा । दास तुकड्या म्हणे ।।
शानदार भारताची स्वप्न पाहणारे राष्ट्रसंत हे एक द्रष्टे राष्ट्रप्रचारक असून त्यांनी धार्मिक शिक्षण व नितिमत्ता या सोबतच सर्व देशाने सदैव जागृत राहून भारतमातेचे रक्षण करण्यासाठी युवकांच्या भूमिकेचा एका सच्चा सैनिकांच्या भुमिकेत प्रवेश केलेला आहे. युवकांनी ही जबाबदारी एक सेवक म्हणून पार पाडावी म्हणजेच सैनिक व सेवक ही भूमिका वठवावी असेही त्यांनी आपल्या भजनातून सांगीतले आहे.
भारत शानदार हो मेरा । भारत शानदार हो मेरा ।
मै सेवक बलवान सिपाही । रहू देश को प्यारा ।।1।।
शुद्ध चरित्र लीनता ममता । यही मेरा निर्धारा ।
हिन्दू इसाई बुद्ध पारसी । मुस्लिम जीन गुरूद्वारा ।।2।।
विश्वबंधुत्वाची संकल्पना राष्ट्रसंतांनी सर्व जगाला सांगीतली. मानवता, विश्वबंधुत्व या मूल्यांद्वारा भारताचे नाव सर्व जगाला उंचावून सांगणारे संत ज्ञानेश्वरापासून वैराग्यमूर्ती गाडगे महाराजापर्यंत सर्व संत हे क्रांतदर्शी विचारवंत आहेत. हा देशची माझा देव हा भाव त्यांच्या ठायी असल्याने त्यांनी सेवा, भक्ती , शौर्य, तत्परता व नितीमत्ता यांची रूजवणूक भारतीय समाजमनाच्या सुपिक जमिनीमध्ये केली. त्याद्वारा त्यांनी भारतीय अस्मितेची जागृती केली आहे. उद्योगी भारताने प्रगतीची नवक्षितीजे गाठून शौर्य, मित्रता व सामुदायीक प्रार्थनेच्या माध्यमातून रामराज्य निर्माण होईल. असा आशावाद त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात मोठ्या आदराने व विश्वासपूर्वक निर्माण केला आहे.
सदा रहू उद्योगी तनसे । करू व्यायाम पियारा ।
नित्य करू प्रार्थना सामुहीक । लेकर जण- गण सारा ।।1।।
सुंदर गांव बनाए बहादू । मित्र प्रेम की धारा ।
तुकड्यादास कहे घर घर । करू रामराज्य पियारा ।।2।।
शानदार भारत देशामध्ये सर्व खेडे व गावांचा विकास होऊन रामराज्याच्या निर्मितीचे स्वप्न पाहणा-या वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना शतशः नमन !
जयगुरू !!
डॉ. हरिदास आाखरे