शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

शनिदोष दूर करायचा आहे? तर दर शनिवारी अशी करा शनिपूजा; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 8:00 AM

धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार शनिवार शनिदेवाचा दिवस मानला जातो. अशुभ प्रभाव किंवा शनि दोषांपासून मुक्त होण्यासाठी शनिवारी शनिदेवची पूजा करावी.

नऊ ग्रहांपैकी शनि हा सर्वात तापट आणि कठोर ग्रह मानला जातो कारण तो न्यायाचा सर्वोच्च देव आहे आणि प्रत्येकाला त्याच्या कर्मांनुसार फळ देतो. शनि देवांचे नाव ऐकून बरेच लोक घाबरतात कारण त्यांना वाटते की शनिदेव नेहमीच वाईट आणि अशुभ परिणाम देतात, परंतु तसे तसे नाही. जी व्यक्ती शनिदेवला प्रसन्न करते, तिच्यावर शनिदेव प्रसन्न होतात. त्यांच्या कृपेने रंकाचा राव आणि अवकृपेने रावाचा रंक होऊ शकतो. एवढी शक्ती त्यांच्यात आहे. म्हणून शनिदेवला प्रसन्न करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. यासाठी शनिवार सर्वोत्तम दिवस मानला जातो.

शनिवारी शनिदेव यांच्यासमवेत हनुमानाची पूजा करावी

धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार शनिवार शनिदेवाचा दिवस मानला जातो. अशुभ प्रभाव किंवा शनि दोषांपासून मुक्त होण्यासाठी शनिवारी शनिदेवची पूजा करावी. त्याचबरोरबर शनिवारी शनिसमवेत हनुमानाची पूजा केल्यास तुम्हाला दुप्पट फायदा होऊ शकेल. असे मानले जाते की हनुमानाची उपासना केल्यास शनिदेवचा राग शांत होतो आणि शनिदेव हनुमानाच्या भक्तांना त्रास देत नाहीत. म्हणून शनिवारी महाबली हनुमानाची पूजा करावी.

१. शनिवारी सकाळी स्नानानंतर हनुमानाचा 'ओम हनुमंताये नमः' चा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने शत्रूंचा नाश होतो आणि सर्व प्रकारचे संकट दूर होते.

२. शनिवारी एकापेक्षा जास्त वेळा हनुमान चालीसाचे पठण करावे. यामुळे शनि दोषापासून स्वातंत्र्य मिळते आणि बजरंगबली भगवान हनुमान देखील प्रसन्न होतात ज्यामुळे त्याची कृपा भक्तांवर असते.

या दोन सोप्या गोष्टींबरोबर आचरणात शुद्धता असणे या दोघांना अभिप्रेत असते. ज्येष्ठांची सेवा, गरजूंना दान, मदत, श्रमदान या गोष्टी करणाऱ्या लोकांवर शनी महाराजांची कृपादृष्टी कायम राहते. एवढेच नाही, तर महावीर हनुमान अशा भक्तला सिद्धी, वृद्धी, शक्ती प्रदान करतात. साडेसाती दूर व्हावी असे वाटत असेल, तर आपले आचरण सुधारा, म्हणजे शनी महाराजांच्या शिक्षेची भीती वाटणार नाही. कारण त्यांच्या अवकृपेची वेळच आपण येऊ देणार नाही. 

जय शनिदेव! जय हनुमान! जय श्रीराम!