शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

मनुष्य सोडून इतर प्राण्यांमध्ये वाद न होण्याचे कारण जाणून घ्यायचे आहे? वाचा इयत्ता चौथीतली कविता!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 11:22 AM

इतर प्राण्यांपेक्षा सगळ्या बाबतीत प्रगत असूनही मनुष्य प्राणी दुःखी, असमाधानी, नैराश्यमय आयुष्य का जगतोय? याचं उत्तर या कवितेत दडले आहे. 

'बालपणीचा काळ सुखाचा' असे आपण म्हणतो. त्या वयात आपल्यावर कोणत्या जबाबदाऱ्या नाहीत म्हणून आपण आनंदी असतो का? तर नाही! मुलं जेवढं मिळालं त्यात आनंद मानतात. रागवतात, चिडतात पण पुढच्या क्षणी विसरून जातात आणि खेळायला सुरुवात करतात. त्यांच्या मनात कोणाबद्दलही भेदभाव, द्वेष, मत्सर या गोष्टी नसतात. त्यामुळे स्पर्धा नसते, ना स्वतःशी ना दुसऱ्यांशी. प्रत्येक दिवस ते आनंदाने जगतात. गृहपाठ करून मोकळे होतात. नसेल केला तर मार खाण्याची तयारी ठेवतात. या पारदर्शक स्वभावामुळे ते आनंदात असतात. यावरून बालपणीची एक कविता आठवते, प्रश्न! प्रभा मुळे यांची ही कविता आहे. यात त्यांनी बालमनातून मांडलेली कविता मोठ्यांच्या जगण्याचे मर्म सांगणारी आहे. ती वाचताना तुम्ही तालासुरात वाचाल आणि त्यावर विचार करून आपले जीवन जास्तीत जास्त निर्मळ, आनंदी आणि टेन्शन फ्री बनवण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे. 

प्रश्न

पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कलामाणसाला का जमत नाही, प्रश्न पडतो मला 

चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा गाय काळजी करत नाही मिळेल का चारा मला 

कोकीळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग 

बैल कधी म्हणत नाही मीच का राबू कावळा कधी विचारत नाही वापरू कोणता साबू?

ससा कधीच म्हणत नाही मीच का भित्रा वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा 

जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता माणसाच्या मनात असतो विचारांचा गुंता!