>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी आनंदाचा आणि समाधानाचा असणार आहे. एखादा प्रमुख टप्पा गाठला जाईल. त्यामुळे तुम्हाला आतून उत्साह वाटेल. एखादा कार्यक्रम ठरेल. एखादा सण साजरा केल्यासारखा आनंद होईल. सगळ्यांची साथ मिळेल. एक चांगले निष्पन्न निघेल. केलेल्या कष्टाचं चीज होईल. पुढची वाट मोकळी होईल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या परिश्रमाचे चांगले परिणाम अनुभवणार आहात. त्यासाठी तुम्ही थोडी सवड काढण्याची गरज आहे. तुम्हाला ज्यांनी आत्तापर्यंत साथ दिली त्यांच्याबद्दल कृतज्ञ रहा. आत्ता पाया मजबूत करुन पुढचे नियोजन करण्याची तयारी सुरु करा. "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" असे वागा!
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी धैर्य आणि संयमाचा कस लावणारा असणार आहे. तुमच्यातील चांगुलपणाची एक प्रकारे परीक्षा होईल. पण तुम्ही जर या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर पुढचा मार्ग निश्चितच सोपा होईल. या काळात तुम्हाला यश मिळवणे अवघड वाटेल. काहीतरी मिळवायला वाट बघावी लागेल. शरीरापेक्षा मनाचे बल महत्त्वपूर्ण ठरेल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही नियमसंयम ठेवून वागलात तर तुम्हाला तुमच्या अपेक्षित ध्येयापर्यंत पोचणे सोपे जाईल. वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवण्याचा हा काळ आहे. राग लोभ मत्सर अशा तमोगुण प्रधान वृत्तीवर शुद्ध सात्विक शांत भावनेने मात करा. सौम्य शांततेचा मार्ग निवडणे म्हणजे सुध्दा एक प्रकारचे धाडसाचे काम आहे हे विसरु नका.
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन आनंद, घेऊन येत आहे. तुम्ही जे करत आहात, त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहात. अडकलेले काम सुटेल. मोकळेपणाने तुमच्या भावना व्यक्त केल्या तर चांगला मार्ग निघेल. समस्या पूर्ण नाही सुटली तरी ती कशी सोडवता येईल याचा अंदाज येईल. एकूण परिस्थिती सुधारेल. तब्येत चांगली होईल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही बुद्धीपेक्षा मनाने काम करण्याची गरज आहे. तुमचं अंतर्मन काय सुचवत आहे, तुम्हाला आतून काय वाटत आहे ते ऐकण्याची गरज आहे. लोकांशी चांगले, सद्भावनांचे संबंध ठेवा. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आवडीच्या विषयात नवीन सुरुवात करा. कृतज्ञता बाळगा.
संपर्क : ९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.