शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

नवीन वर्षच काय, तर संपूर्ण आयुष्य आनंदात घालवायचं असेल तर आजच शिकून घ्या 'हा' मंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 7:00 AM

New Year Resolution 2024: आज २०२४ या इंग्रजी वर्षाचा पहिला दिवस, या दिवशी दिलेला मंत्र जर पाठ केलात तर पूर्ण वर्ष, नव्हे तर पूर्ण आयुष्य आनंदात जाणार हे समजा!

सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नवीन इंग्रजी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! हे वर्ष आनंदाचे, भरभराटीचे, समाधानाचे जावो, अशा सदिच्छाही तुम्हाला अनेकांकडून मिळाल्या असतील. पण ते मिळवण्यासाठी काय प्रयत्न करायचे, ते वाचा!

बालपणी कोणी काही बोलले की रागावून आपण आईजवळ तक्रार करायचो. त्यावर आईचे ठरलेले उत्तर असे, 'जाऊदे, लक्ष देऊ नकोस. तू चिडलास तर तर ते आणखी चिडवतील!" किती सोपा कानमंत्र होता, पण तो अमलात आणणे आजतागायत आपल्याला जमलेले नाही. तेच जमवता आले पाहिजे...!

कधी कधी आपण इतके संवेदनशील होतो, की कोणाच्याही वाईट बोलण्या-वागण्याचा आपल्या मानसिकतेवर, कामावर, स्वभावावर विपरित परिणाम होतो. बोलणारा बोलून जातो, आपण अश्रू ढाळत बसतो. संवेदनशील असणे, माणुसकीच्या दृष्टीने चांगले आहे. परंतु अति संवेदनशील होत आपली प्रगती खुंटवून घेणे, वेडेपणाचे ठरू शकते.

सद्यस्थितीत आपण आपल्या मनस्थितीचे अधिकार विनाकारण दुसऱ्याच्या हाती देऊन ठेवले आहेत. आपल्या कामाला जोवर दुसऱ्यांकडून प्रशंसा मिळत नाही, तोवर आपल्याला आपल्याच कलाकृतीचा आनंद मिळत नाही. समाज माध्यमांच्या भाषेत सांगायचे, तर लाईक, कमेंट, शेअर यावर आपला आनंद अवलंबून असतो. कमी लाईक आले, खोचक कमेंट आली, कोणी जाहीर सल्ला दिला, की आपल्या मन:शांतीला सुरूंग लागलाच म्हणून समजा. या आभासी जगात आपण एवढे गुंतून जातो, की चांगले वाईट याची समज गमावून बसता़े 

आपल्या कामाचे आपल्याला समाधान मिळणे हे सर्वात आधी महत्त्वाचे आहे. इतरांनी प्रशंसा केली तर ठीक, नाही केली, तरी ठीक. एवढी स्थितप्रज्ञता अंगी बाणता आली पाहिजे. आपल्याला चांगल्या वाईट प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांचा उद्देश नेहमी निर्मळ असतोच असे नाही. कोणी खरी प्रशंसा करतात, कोणी खोटी, कोणी उगीच चूका काढतात, तर कोणी फक्त चूकाच शोधतात. म्हणून अशा चांगल्या वाईट प्रतिक्रियांसाठी बुद्धीची दारे खुली ठेवा, परंतु चांगले म्हटले म्हणून हुरळून जाऊ नका आणि वाईट बोलले म्हणून दुखावले जाऊ नका. 

'हाथी चले बाजार, कुत्ते भोंकें हजार' ही म्हण आत्मसात करा. यालाच मराठीत 'अंगाला लावून न घेणे, असे म्हणतात. आपण राजकारणी, सिनेमा, कला, क्रिडा जगतातील प्रसिद्ध लोकांना पाहतो. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो तसेच अगदी हिन दर्जाची शेरेबाजीदेखील होते. त्यांनी जर प्रत्येक प्रतिक्रिया मनाला लावून घ्यायची ठरवली, तर त्यांची प्रगती होऊ शकेल का? नाही ना? स्वत:ला सेलिब्रेटी समजा आणि प्रतिक्रियांचे स्वागत करा पण त्यात अडकून राहू नका.

या सवयीने तुमचे मन एवढे कणखर बनेल, की कोणी काहीही प्रतिक्रिया दिली, तरी तुमच्या आनंदात विरजण पडणार नाही. चेहऱ्यावर क्षणिक प्रतिक्रिया उमटेल, पण त्यावर योग्य प्रतिसाद देण्यासाठी तुमच्या मनाची तयारी झालेली असेल. 

एकाने दुसऱ्याच्या हातावर चापटी मारण्याचा खेळ आठवतो? तेव्हा एखाद दुसरा फटका बसतो, परंतु त्यानंतर आपण एवढे सावध होतो, की मारणारा निशाणा धरून कंटाळतो. हाच खेळ आपल्याला मनाला शिकवायचा आहे. एखाद दुसरा फटका बसेल, पण पुढच्यावेळेपासून मन सावध पवित्रा घेईल आणि कोणत्याही स्थितीत मन:शांती गमावणार नाही!

टॅग्स :New Yearनववर्षMental Health Tipsमानसिक आरोग्य