तुम्हाला साधनापादाकडे घेऊन जाणार्या आणि हा मार्ग निवडलेल्या व्यक्तींच्या अनुभवांची ओळख आपल्याला या मालिकेमधील लेख आणि व्हिडिओंद्वारे होईल.आध्यात्मिक उन्नतीची वेळआध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणार्या लोकांसाठी ग्रीष्म ऋतु आणि मकर संक्रांतीदरम्यानचा काळ अतिशय महत्वाचा आहे. याला साधनापाद म्हणतात – जो ग्रहणशीलतेचा उत्तम काळ म्हणून ओळखला जातो. योग परंपरांमध्ये आणि विशेषतः उत्तर गोलार्धात, हा कालावधी साधनेसाठी अतिशय अनुकूल मानला जातो जेंव्हा आध्यात्मिक बनणे अतिशय सहज नैसर्गिक प्रक्रिया बनते. या कालावधीत केलेल्या साधनेचे सर्वोत्तम परिणाम प्राप्त होतात.सहजगत्या स्व-परिवर्तनाची वेळएखाद्या व्यक्तीला या जगात संपूर्णपणे कार्यरत राहण्यासाठी आवश्यक असणार्या अनेक गोष्टींपैकी, सर्वात महत्वाचे पैलू म्हणजे समतोल आणि स्पष्टता. एक संतुलित जीवन जगण्यासाठी केवळ बाह्य क्रिया-कलापांच्या व्यतिरिक्त अधिक काहीतरी आवश्यक असते, आपल्या आत काय घडते आहे हे सुद्धा महत्वाचे असते. साधनापाद हा एक असा काळ आहे ज्यात प्रत्येक व्यक्तीला तिचे मन आणि भावना स्थिर करून जीवनातील कोणत्याही परिस्थितीमधे सहाय्यक बनेल असा स्थिर आधारभूत पाया निर्माण करण्याची संधी असते.
साधनेद्वारे ग्रहणशीलतेचा उत्तम काळ कोणता?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 11:11 AM