शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

ज्याला तुम्ही शत्रू समजता, तोच तुमचा मित्र निघाला तर? वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 2:18 PM

व्यक्त होण्याआधी परिस्थितीचा आढावा घ्या आणि या विश्वाशी मैत्रीचे नाते जोडत चला...!

जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत तेव्हा आपण लगेच नाक मुरडून मोकळे होतो. परंतु जेव्हा खरी परिस्थिती कळते तेव्हा समोरच्या व्यक्तीला नजर देण्यासही आपण पात्र ठरत नाही. म्हणून एखाद्या गोष्टीवर पटकन प्रतिक्रिया न देता थांबून, विचार करून व्यक्त व्हा, म्हणजे पश्चताप होणार नाही आणि ज्याला शत्रू समजत होतात त्याच्याशी शत्रुत्व पण राहणार नाही. 

एकदा एका खेडेगावात एक पोस्टमन होते. त्यांना जवळपास सगळी घरं परिचयाची होती. एक दिवस त्यांच्याकडे एक पार्सल आलं आणि ते पार्सल एका अनोळखी पत्त्यावर पोहोचवायचं होतं. पोस्टमन काका काम पूर्ण करायला म्हणून मजल दरमजल करत त्या पत्त्यावर पोहोचले. दुपारच्या उन्हात त्यांना घामाच्या धारा लागल्या. घशाला कोरड पडली. पोस्टांचं पार्सल देण्यासाठी ते त्या घरी पोहोचले आणि त्यांना दाराची कडी वाजवली. 

आतून आवाज आला, 'कोण आहे?''पोस्टमनsss तुमचं पार्सल आलं आहे', पोस्टमन काका उत्तरले. आतून परत आवाज आला, ' हो का? दारात ठेवून तुम्ही जा, मी घेते नंतर...'

पोस्टमन काकांना राग आला. एवढ्या रणरणत्या उन्हात मी दूरवर चालत पार्सल द्यायला आलो आणि घरातल्यांना दारापर्यंत यायला कष्ट लागतातेत? ते जरा रागातच म्हणाले, 'तुमच्या सही शिवाय ते देता येणार नाही. दार उघडा.' आतून आवाज आला, 'हो का? आले आले.'

साधारण पाच मिनिटांनी दार उघडलं. एक लहान मुलगी व्हील चेअर वर बसून समोर आली आणि म्हणाली, 'काका, कुठे सही करू सांगा!'तिला पाहून पोस्टमन काकांचे डोळे पाणावले. त्यांना वाईट वाटलं. सही घेतली पार्सल दिल आणि ते निघाले. 

काही दिवसांनी पुन्हा त्याच घरी पार्सल देण्याची वेळ आली. तेव्हा पोस्ट्मन काका तिथे पोहोचले आणि दाराची कडी वाजवत सांगितले, 'पोरी दाराशी पार्सल ठेवले आहे, सावकाश ये मी थांबतो.' 

मुलगी व्हील चेअर ढकलत आली. तिने स्मित हास्य करून काकांना सही दिली आणि थांबायला सांगून आत गेली. एक पार्सल बाहेर घेऊन आली व पोस्टमन काकांना देत म्हणाली, 'काका तुम्ही सगळ्यांसाठी एवढी मेहनत घेत अनवाणी फिरता हे मी गेल्या वेळेस पाहिलं म्हणून तुमच्यासाठी चपला मागवल्या, होतात का बघा बरं?'

पोस्टमन काकांना रडू कोसळलं...  जिला स्वतःला पाय नाही तिने आपल्या पायांची काळजी वाहिली आणि मी मात्र माझे पाय सुरक्षित करूनही तिच्या पायांसाठी काहीच करू शकणार नाही... !

म्हणूनच व्यक्त होण्याआधी परिस्थितीचा आढावा घ्या आणि या विश्वाशी मैत्रीचे नाते जोडत चला...!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी