>> आदित्य राजन जोशी
गर्भाधान संस्कार म्हणजे काय तर स्त्री-पुरुषाचा विवाह अत्यंत महत्त्वाचा मानून, संभोगाच्या कृतीतून स्त्रीच्या गर्भधारणेच्या प्रक्रियेला गर्भाधान असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये स्त्रीचे रज आणि पुरुषाचे वीर्य यांच्या मिलनातून स्त्रीच्या गर्भाशयात एक नवीन जीव बनतो, जो ती नऊ महिने तिच्या गर्भाशयात धारण करते. या प्रक्रियेला गर्भाधान संस्कार म्हणतात.
रजोदर्शनापासुन १६ रात्रींपर्यंत स्त्रियांच्या ऋतुकाळी गर्भसंभव होउ शकतो.या संस्कारासाठी ऋतुदर्शनापासुन पहील्या चार रात्री वर्ज्य कराव्या.अशुभ दिवस,ग्रहणदिवस,कुयोग त्या दिवशी असु नये. राजोदर्शनापासून पहिल्या चार, अकरावी आणि तेरावी रात्र सोडून शेष दहा रात्री या संस्कारास योग्य समजाव्या. कित्येकदा ‘चौथा दिवसही घ्यावा’, असे म्हणतात. गर्भाधानसंस्कारास चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, चतुर्दशी, अमावास्या आणि पौर्णिमा या तिथी वर्ज्य कराव्यात. उर्वरित कोणत्याही तिथीस आणि सोमवार, गुरुवार, शुक्रवार या वारी, श्रवण, रोहिणी, हस्त, अनुराधा, स्वाती, रेवती, उत्तरा, शततारका या नक्षत्री उत्तम चंद्रबळ पाहून गर्भाधानविधी करावा.
गर्भाधान विधी खालीलप्रमाणे
प्रथम संकल्प, गणपती पूजन , पुण्याहवाचन , मातृका पूजन, नांदीश्राद्ध , प्रधानाज्य होम, अग्नी सूर्य यांचे स्थवन करून अश्वगंधा अथवा दुर्वा यांचा रस स्त्रीच्या उजव्या नाकपुडीत पिळला जातो. या नंतर स्त्रीची ओटी भरतात. अश्या प्रकारे गर्भाधान संस्कार पूर्ण होतो. आपल्या कुलपुरोहित किंवा वेद शास्त्र संपन्न गुरुजींकडून या विधी विषयी बाकीची माहिती घ्यावी.
विकासाची प्रक्रिया गर्भधारणेच्या क्षणापासून सुरू होते. एक भ्रूण कोशिका जी बीजांड आणि शुक्राणूंच्या मिलनाने तयार होते, ज्यामध्ये सर्व अनुवांशिक माहिती कोड केली जाते, ज्यामुळे काही काळानंतर संपूर्ण मानव (जीव) तयार होतो. शुभ मुहूर्तावर गर्भाधान संस्कार केल्याने सुंदर, निरोगी, तल्लख, गुणवान, हुशार, प्रतिभावान आणि दीर्घायुष्य लाभलेले बालक जन्माला येते. म्हणूनच या पहिल्या संस्काराला खूप महत्त्व आहे.
सुप्रजा सिद्धांताप्रमाणे योग्य गर्भधारणेच्या दृष्टीने गर्भधारणेच्या अगोदर पिंडशुद्धी होणे आवश्यक असते कारण चांगल्या बीजशक्तीमुळेच चांगली संतती निर्माण होते. संत तुकाराम महाराज म्हणतात,
शुद्ध बीजापोटी ! फळे रसाळ गोमटी !!मुखी अमृताची वाणी ! देह देवाचे कारणी !!सर्वांग निर्मळ ! चित्त जैसे गंगाजळ !!
लहानपणापासुन या अभंगातील पहील्या ओळी प्रत्येकानेच ऐकल्या असतील.संत तुकारामांचे अभंग म्हनजे उत्तम अशी उपदेशात्मक सुभाषिते होत.जी बालपणापासुनच आपल्या कानावर पडतात.सदरील अभंगातुन तुकारामांनी बिजाचे आणि संस्काराचे महत्व सांगीतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात की बीज( बियाणे )जर शुद्ध असेल,कसदार,संस्कारी असेल तर त्या झाडाला फळेही गोमटी म्हनजे चांगलीच येणार.आणि ती फळे रसाळ आणि गोडच असणार.जर बीज किडके असेल कमकुवत असेल तर त्या बिजापासुन बनलेले झाड आणि त्याला येणारी फळे ही सुद्धा कमकुवतच निपजतात.या बिजाप्रमाणेच जर माणुस संस्कारी असेल.निर्व्यसनी,पुण्यवान,शिलवान, चारित्र्यवान शुद्ध असेल तर त्याच्या पोटी जन्मणारी संततीही गोमटी आणि शिलवान,चारिञ्यवान,संस्कारी निपजेल.त्यामुळे माणसाच्या मुखात नेहमी अमृताची वाणी असावी.माणसाने नेहमी गोड बोलावे.हे शरीर ईश्वर भक्तीत लिन असावे माणसाचे मन आणि शरीर गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ आणि शुद्ध असले पाहीजे.
गर्भाधानाचा अर्थ पुढच्या भागात जाणून घेऊ...!
(क्रमश: )