आम्ही समजून घेत आहोत की, संसार काय आहे ? आणि मृत्यु काय आहे ? आम्ही याचा शोध घेत आहोत. आम्ही मृत्यु बद्दल इतके भयभीत का आहोत ? तुम्हाला माहित आहे, मरायचा काय अर्थ आहे ? काय तुम्ही डझनावरी लोकांना मरतांना नाही पाहिले ? तेव्हा तुम्ही कधी खोलवर शोध घेतला की मृत्यु काय आहे ? हा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे, तितकाच महत्वपूर्ण जितका की हा प्रश्न की जीवन काय आहे. आम्ही म्हणतो की, जीवन हेच आहे, अनाठायीच्या माहित्या, रोज नऊ वाजता आॅफीसला जा या, वादविवाद, संघर्ष, अमके नको आहे तर तमके हवे आहे. तर जीवन हे आहे असे कदाचित आम्ही जाणले आहे. परंतु आम्ही गंभीरतेने कधीही शोध घेतला नाही, जाणले नाही, समजून घेतले नाही की मृत्यु काय आहे ? काय आहे मरण ? निश्चितच मृत्यु एक असाधारण गोष्ट असली पाहिजे. प्रत्येक वस्तु तुमच्याकडून हिसकावून घेते, तुमची आसक्ती, तुमचा पैसा, तुमची पत्नी, तुमची मुले, तुमचा देश, तुमच्या अंधश्रध्दा, तुमचे सर्व गुरु, तुमचे सर्व देव. तुमची कामना असू शकते की, या सर्व गोष्टी मृत्युनंतर सोबत दुसर्या दुनियेत घेऊ जाता याव्यात. परंतु तुम्ही असे नाही करु शकत. मात्र तरीही तुम्ही शरीर धारण कराल, असा तुम्ही विश्वास ठेवता. ही कल्पना फार संतोषजनक आहे, पण यथार्थ नाही. आम्ही लोक शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहोत की, जीवन जगत असतांनाच, मरण्याचा काय अर्थ आहे. आत्महत्या करणे नाही. तशा मुर्खतेबद्दल मी बोलत नाही आहे. मृत्युचा काय अर्थ आहे ? मला याचा शोध घेत जे म्हणायचे आहे त्याचा आशय असा आहे की, काय स्वतःसह माणसाने जे काही निर्मित केले आहे, त्या सर्वांपासून माणूस पूर्णतया मुक्त होऊ शकतो ? मरण्याचा अर्थ काय आहे ? मी खरोखर शोध लावू इच्छितो, तसाच जसे तुम्ही शोध लावू इच्छिता की मृत्यु काय आहे ? मी तुमच्या करिता बोलत आहे. आम्ही तरुण असोत की वयोवृध्द, मृत्यु काय आहे हा प्रश्न सदैव कायम आहे. मृत्यु काय आहे, असा प्रश्न स्वतःला विचारा. याचा अर्थ आहे पूर्णपणे मुक्त होणे. माणसाने जे निर्मित केले आहे, त्या सर्वांपासून अनासक्त होणे. कोणतीही आसक्ती नाही, कोणतेही भविष्य नाही, कोणतेही अतीत नाही, जीवंत असून मृत होणे. याचे सौंदर्य, याची श्रेष्ठता, याची असाधारण शक्ती तुम्ही पाहत नाही. याचा तुम्ही काय अर्थ लावत आहात ? याचा अर्थ काय आहे, आपण जाणत आहात ? आपण जीवंत आहात, पण प्रत्येक क्षणात आपले मरण होत आहे आणि या प्रकारे संपूर्ण जीवनात तुम्ही कोणत्याही वस्तुप्रती आसक्त नाही. हाच अर्थ आहे मरणाचा. या प्रकारचे मरणच आहे जीवन. काय तुम्ही हे समजत आहात ? अशा जीवंत असण्याचा अर्थ आहे प्रति दिन तुम्ही आपल्या अासक्तीच्या प्रत्येक वस्तुचा परित्याग करीत जात आहात. काय तुम्ही हे करु शकता ? पूर्णतः स्पष्ट व सरळ यथार्थ आहे, परंतु विस्मयकारी आहेत याचे गुढ अर्थ. याप्रकारे प्रत्येक दिवस नवीन आहे. प्रती दिन तुमचा मृत्यु होत आहे आणि तुम्ही पूनर्जीवितही होत आहात. यात विस्मयकारी ओजस्विता आहे, उर्जा आहे. कारण तुम्ही कोणत्याही गोष्टीने भयभीत नाही. अशी कोणतीही गोष्ट नाही जी तुम्हाला आघात पोहचवेल. माणसाने जे काही उभारले आहे, निर्मित केले आहे, त्या सर्वांचा परित्याग करावा लागेल. हाच आहे मरणाचा अर्थ. काय तुम्ही असा प्रयत्न कराल ? काय तुम्ही असा प्रयोग कराल ? केवळ एक दिवस नाही, प्रतिदन.
जे.कृष्णमूर्ति यांना श्रध्दा नमन शं.ना.बेंडे, अकोला