जन्म लग्न कुंडलीमध्ये पहिल्या, चवथ्या, सातव्या, आठव्या आणि बाराव्या स्थानात मंगळ असल्यास तो विवाहसुखासाठी अशुभ मानला जातो. पती पत्नी दोघांच्याही कुंडलीत या स्थानात मंगळ असावा. कोणा एकाच्या कुंडलीत असेल या स्थानांत तो असावा. कोणा एकाच्या कुंडलीत तो असेल, तर त्रासदायक असतो.
मंगळाच्या कुंडलीत सातव्या स्थानात गुरु शुक्र असल्यास मंगळाचे अनिष्ट फळ मिळत नाही.मंगळाच्या कुंडलीत पहिल्या (मेष), आठव्या (वृश्चिक), दहाव्या (मकर) राशीत असल्यास मंगळाचे अनिष्ट फळ मिळत नाही. मंगळाच्या कुंडलीत वर दाखवलेल्या स्थानात व त्या राशीत मंगळ असेल. उदा. धनू राशीत बाराव्या स्थानातील असेल, तर मंगळाची कुंडली मानू नये.
मंगळाची कुंडली असल्यास नियमित करायचे उपाय-
१. गुरुगीता, शिवकवच, पंचमुखीहनुमत्त्वकवच यांचा नित्यपाठ करावा.२. नित्य शिवाभिषेक करावा. एकादशी शिवाय अन्य दिवशी शिवलिंगावर अखंड तांदूळ वाहावे. अखंड नामस्मरण, गुरुभक्ती करावी. ३. एकादशी व सोमवारचा उपास करावा.४. मंगळवारी गायीला गूळ व चणाडाळीचा घास द्यावा. एकादशीच्या दिवशी देऊ नये. ५. पौर्णिमेला कुलदेवता, ब्राह्मण यांचे पूजन करावे. त्यांना भोजन, दान द्यावे. ६. मिळकतीपैकी ३० ते ५० टक्के धन पंचमहायज्ञात खर्च करावे.
हे उपाय न केल्यास कौटुंबिक सुखाची आशा धरू नये.