नाक हा सुंदर आकर्षक व्यक्तिमत्त्वात भर घालणार मुख्य घटक असतो. प्रत्येकाच्या नाकाची ठेवण वेगवेगळी असते. एवढेच काय तर नाकावरून आपल्याकडे प्रसिद्ध म्हण आहे, नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न! ही विघ्न का? तर केवळ नकटे नाक असते म्हणून का? तर नाही! समुद्र ज्योतिष नाकाच्या ठेवणीवरून सांगते आपले व्यक्तिमत्त्व, भविष्य आणि स्वभाव. आपापल्या नाकाची ठेवण आपल्याला माहित आहेच, चला आता नाकावरून भविष्यही जाणून घेऊ. फक्त हे वाचून नाकावर राग येऊ देऊ नका म्हणजे झालं!
>> ज्यांचे नाक सरळ असते, ते लोक आपल्या मनातल्या गोष्टी कोणालाही पटकन सांगत नाहीत. आपल्या प्रश्नांची उत्तरं यशस्वीपणे स्वतःच शोधतात. असे लोक प्रेमाच्या बाबतीत थोडे कमनशिबी असतात.
>> ज्यांच्या नाकाचा शेंडा थोडा वरच्या बाजूने ओढलेला असतो, अशा लोकांमध्ये आत्मविश्वास चांगला असतो. त्यांच्यात नेतृत्त्वाचे गुण असतात. ते शीघ्रकोपी असतात पण राग लवकर जातोसुद्धा! त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा असतो.
>> ज्यांचे नाक पोपटासारखे थोडे खालच्या बाजून झुकलेले असते, असे लोक स्वभावाने गंभीर असतात. त्यांना राग पटकन येतो आणि तो राग ते दीर्घकाळ डोक्यात ठेवतात. ते अतिशय मेहनती असतात आणि करिअर बाबतीत त्यांना हलगर्जीपणा जराही चालत नाही.
>> नकटे व चपट्या नाकाचे लोक कलाकार असतात. पण त्यांचा मुख्य स्वभाव दोष म्हणजे चंचलता. घटकेत राग घटकेत आनंद. अशामुळे त्यांना त्यांच्याच वागण्या बोलण्याचे ताळतंत्र सांभाळता येत नाही. मात्र कोणताही निर्णय घेताना ते अतिशय विचारपूर्वक घेतात.
>> छोट्या नाकाचे लोक आपल्या आयुष्यात अगदी आनंदी असतात. मात्र त्यांना चारचौघात उठबस करण्याची हौस जरा कमीच असते.
>> सरळ आणि लांब नाकाचे लोक भाग्यवान असतात. दिसण्याच्या बाबतीत, नशिबाच्या बाबतीत, मिळकतीच्या बाबतीत अग्रेसर असतात. त्यांचे आयुष्य इतरांच्या तुलनेत आनंदाचे आणि समाधानाचे असते. त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे ते लोकप्रिय असतात.