शहरं
Join us  
Trending Stories
1
Hathras Stampede : हाथरसचं सत्संग मैदान बनलं 'स्मशानभूमी'; चेंगराचेंगरीतील ११६ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
2
मविआच्या ३ उमेदवारांमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस; माघार की घोडेबाजार? फैसला शुक्रवारी
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : ३ जुलै २०२४; आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक, घरात आनंदाचे वातावरण
4
रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच, आक्रोश अन् किंकाळ्या...; मृतदेह पाहून शिपायाला हार्ट अटॅक
5
नीट प्रकरणात दोन्ही आरोपींना ५ दिवसांची CBI कोठडी; पालकांनाही आरोपी करण्याची मागणी
6
जुलैत पावसाची सेंच्युरी; सरासरीपेक्षा १०६ टक्के बरसण्याचा अंदाज
7
मराठा आरक्षणाविरोधी याचिकांमध्ये मागासवर्ग आयोग महत्त्वाचा प्रतिवादी
8
MSRDC चे प्रकल्प, कार्यालये सौरऊर्जेने उजळणार; संपूर्णपणे अक्षय्य ऊर्जेच्या वापराच्या दिशेने पाऊल
9
बाबूजी सामान्यांचा आवाज, विचारांची बांधील राहून पत्रकारितेची मूल्ये जपली -  विजय दर्डा
10
आधी हिजाबबंदी, आता जीन्स, टी-शर्टलाही मनाई; कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवा ड्रेसकोड
11
नौदल अधिकारी गुंतले मानवी तस्करीत; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती
12
पासपोर्ट सेवा केंद्र भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई; दीड कोटीची रोकड, डायऱ्या दलालांकडून जप्त
13
दुधाची नाशवंतता संपली; मग हमीभाव का नाही?; दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता
14
जगातलं सर्वांत कमी उंचीचं जोडपं! लोकांच्या टोमण्यांचा सामना करावा लागला, पण आज..
15
भावना गवळी, कृपाल तुमानेंना विधानपरिषदेची उमेदवारी; शिंदे गटात नाराजी
16
...तर तो पक्ष लोकांचा पक्ष झाला पाहिजे; राहुल गांधी यांचा उदय, घसरण आणि पुन्हा उदय
17
उमेदवारच झाला संकट! बायडेन यांच्या सुमार कामगिरीमुळे पक्षात अंतर्गत वादविवादच सुरू
18
"सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत, तिसरा पराभव, तरीही काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम...", मोदींचा खोचक टोला
19
"बाबूजी म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील खणखणीत नाणे", देवेंद्र फडणवीसांकडून स्व. जवाहरलाल दर्डांना अभिवादन
20
“जयंत पाटील तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवशंभूचे आई वडील कोण? पार्वतीचे कसे झाले कन्यादान? सद्गुरुंनी केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 3:26 PM

जगाचे पालक म्हणून आपण ब्रह्मा, विष्णू, महेश यांना ओळखतो, पण त्यांचे पालक कोण असतील या प्रश्नांचे उत्तर जाणून घ्या. 

शिवशंभूंचे आई वडील कोण? हा प्रश्न सर्वात आधी उपस्थित झाला तो त्यांच्या लग्नाच्या वेळी! त्यावेळी पालक म्हणून कोण पुढे आले याबद्दल सद्गुरुंनी केलेला खुलासा बघा. 

शिवशंभू यांना पशुपती असेही म्हणतात. कारण या विश्वातील प्रत्येक जीवाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि ती जबाबदारी ते अथकपणे पार पाडत आहेत. त्यांच्या विवाह सोहळ्याला सूर, असुर, दानव, मानव, भूत, पिशाच्च, पशु, पक्षी सगळे वरातीत सामील झाले. कारण ते देवांचेही देव होते आणि असुरांचेही देव होते. पटकन संतुष्ट होणारे आशुतोष अशी त्यांची ख्याती होती. त्यामुळे जो भक्ती भावाने त्यांना आपलेसे करतो, त्यांना ते जवळ करतात. 

त्यामुळे शिवशंभूंच्या विवाहात सगळेच जण सामील झाले होते. हिमालय कन्या पार्वती विवाहासाठी कटिबद्ध झाली. हिमालयाच्या इच्छेविरुद्ध हे लग्न होत असल्याने त्याचा मनापासून पाठिंबा नव्हता, परंतु पार्वतीच्या इच्छेसाठी त्यांनी लग्नाला होकार दिला. मात्र जेव्हा कन्यादानाची वेळ आली, तेव्हा कोणाच्या भरवशावर पार्वती शिवशंभूला द्यायची हा प्रश्न हिमालयाने उपस्थित केला. 

तेव्हा शिवशंभू ध्यानस्थ झाले. त्यांचे पालक कोण याबद्दल आजवर कोणी विचारणा केली नव्हती. आता कोण पुढे येणार? शिवशम्भूचे पालक कसे असणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता वाटू लागली. त्या शांततेत नारदमुनी आपली वीणेची तार छेडत होते. तो आवाज त्या शांततेचा भंग करत होता. सगळ्यांचे ध्यान शिवशंभूच्या उत्तराकडे लागलेले असताना नारदांनी वीणा रसभंग करत होती. तरीही त्यांनी आपले वादन थांबवले नाही. शेवटी हिमालयाने न राहवून नारदांना विचारले, 'इथे सगळेच जण महादेवाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असताना तुम्ही वीणेचा झंकार का करत आहात? काही काळ थांबवत का नाही? 

त्यावर देवर्षी नारद म्हणाले, 'हे वीणावादन नाही तर हिमालया, हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. हिमालयाने प्रश्नार्थक चेहरा केला आणि खुलासा करा असे विनवले. त्यावर देवर्षी म्हणाले, 'महादेव हे स्वयंभू आहेत. त्यांची उत्पत्ती ही नादातून झाली आहे. सर्व प्रकारच्या नाद,सुरांवर त्यांचेच स्वामित्त्व आहे. त्यामुळे त्यांना पालक नाहीत तर तेच विश्वाचे पालक आहेत. हे सांगण्यासाठी मी वीणेचा झंकार करत होतो. 

महादेवाच्या अर्थात शिवशंभूच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे, ते स्वयंभू आहेत. त्याप्रमणे  आपणही स्वयंभू व्हावे. आत्मनिर्भर व्हावे. स्वतःला घडवावे. नवनवीन आव्हान स्वीकारून, कडू घोटांचं हलहल प्राशन करायला शिकावे. यासर्वांसाठी आत्मचिंतन करावे. शिवशंभू हे पहिले हटयोगी म्हटले जातात. त्यांचा आदर्श ठेवून आपणही चिंतन केले पाहिजे. आपल्या भावना आपल्याला नियंत्रित ठेवता आल्या पाहिजेत, आपले आरोग्य, आपले भविष्य आपल्याला घडवता आले पाहिजे. स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्या आणि आयुष्याला सुंदर आकार देऊन स्वतः स्वतःचे पालकत्व स्वीकारा, असे सद्गुरू या कथेचा सारांश सांगतात.