शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
2
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
4
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
5
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
6
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
7
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
8
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
9
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
10
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
11
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
12
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
13
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
14
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
15
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
16
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
17
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
19
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

समस्त प्रवाशांवर 'काळ आला होता पण वेळ नाही' कशामुळे आणि कोणामुळे? वाचा सुंदर कथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 2:41 PM

आपल्या मागेही अनेकांच्या सद्भावना असतात त्यामुळे कोणाशी कधीही वैर ठेवू नका... कोणावर कोणती वेळ येईल सांगता येत नाही!

एकदा काही प्रवासी एका प्रवासी बसमधून तीर्थक्षेत्री दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागले होते. गप्पा, गोष्टी, गाणी, भजन, कीर्तन, खाऊ, थट्टा, मस्करी करत प्रवास मजेने सुरू होता. सगळे जण इतके रमले होते, की रात्र होऊनही कोणाच्याही डोळ्यावर झोप नव्हती. 

एकाएक वादळ सुरू झाले. सोसाट्याचा वारा सुटला. बसची गती आपोआप धिमी झाली. ड्रायव्हर प्रखर लाईटच्या प्रकाशात सांभाळून गाडी चालवत होता. अचानक वीज कडाडली. पावसाळी ऋतू नसूनही अवकाळी पाऊस सुरू झाला. वीजांचा कडकडाट, लखलखाट आणि निसर्गाचे एकूणच रौद्र रूप पाहून बसमधले प्रवासी घाबरल़े सगळे जण देवाचा धावा करू लागले. एक दोनदा तर वीज येऊन बसच्या पायथ्याशी कोसळली. थोडक्यात सगळे बचावले. ड्रायव्हरने बस थांबवली.

तो प्रवाशांसमोर आला आणि म्हणाला, पुढचा प्रवास अतिशय धोक्याचा वाटत आहे. परंतु दोनदा बसच्या दाराशी येऊन वीज पडली, ती पाहता माझ्या मनात एक शंका येत आहे. ती अशी, की आपल्यापैकी कोणा एकाचा मृत्यू निश्चित आहे. त्याच्यामुळे सर्वांवर संकट ओढावत आहे. ज्याचा मृत्यू आहे, तो जर या बसमधून उतरला, तर उर्वरित सर्वांचे प्राण वाचू शकतील.

ड्रायव्हरच्या बोलण्याने सगळेच घाबरले. एकाने शंका उपस्थित केली, की नेमका कोणाचा मृत्यू आहे, हे कळणार कसे? 

ड्रायव्हर म्हणाला, 'माझ्यासकट सगळ्यांनी एक एक करून बसमधून खाली उतरावे आणि काही अंतरावर एक झाड आहे, त्या झाडाला हात लावून बसमध्ये परत याव़े' सर्वांनी त्याचे म्हणणे मान्य केले. बसमधले प्रवासी भितभितच उतरले आणि चिंब पावसात भिजत जाऊन एक एक करून झाडाला हात लावून आले. 

जवळपास सगळे प्रवासी झाले. अगदी ड्रायव्हर आणि कंडेक्टरसुद्धा! शेवटचा एक प्रवासी कोपऱ्यात बसला होता. सगळ्यांच्या माना त्याच्याकडे वळल्या. त्याला उतरणे भाग होते. ज्याअर्थी सगळे जण वाचले, त्याअर्थी आज आपला मृत्यू निश्चित! परंतु आपल्या जाण्याने बाकीच्यांचे प्राण वाचतील, या विचाराने तो शेवटचा प्रवासी दबक्या पावलांनी उतरत झाडाला स्पर्श करायला गेला. तेवढ्यात जोरात वीज कडाडली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले...

झाडाला स्पर्श करायला गेलेला प्रवासी एकटा उरला आणि बसवर वीज कोसळून सगळे प्रवासी जागीच बेचिराख झाले. याचाच अर्थ, त्या एका प्रवाशाच्या पुण्याईने इतका वेळ अन्य प्रवाशांना मृत्यूच्या दाढेत जाण्यापासून रोखले होते. तो दूर जाताच, काळाने घात केला. 

या बोधकथेतून तात्पर्य हेच आहे, की आपले संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांचे दोष शोधण्यात संपवू नका. ज्यांना आपण आपला शत्रू समजतो, कधी कधी त्यांच्याच सदिच्छा आपल्या कामी येतात. म्हणून सर्वांशी नेहमी मित्रत्त्वाने वागा आणि दोष दूर करायचेच असतील, तर स्वत:मधले करा.