शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

घरात देव्हारा असताना मंदिरातही जाऊन देवदर्शन घ्यावे असे आपले पूर्वज का सांगत असत? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 7:00 AM

मन नैराश्याने ग्रासून गेले असेल तर रोज मंदिरात जाण्याची सवय लावून घ्या आणि फरक बघा, वाचा आणखीही फायदे!

पूर्वीच्या तुलनेत अलीकडे लोकांचे मंदिरात जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वी आपले आजी आजोबा अंघोळ करून घरच्या देवाची पूजा करून देव दर्शनाला मंदिरात जात असत. एकटे नाही, तर नातवंडांना सोबत नेत असत. त्यामागे कारण काय असेल? याचा विचार केला आहे का? देव्हाऱ्यातले देव आणि मंदिरातले देव वेगळे आहेत का? नाही! दोन्ही एकच, परंतु स्थानमहात्म्याचा फरक पडतो. 

ज्याप्रमाणे घरी व्यायाम करण्याऐवजी तुम्ही जिम मध्ये जाऊन व्यायाम करणे पसंत करता. का? कारण तिथे जाऊन आपोआप व्यायाम करण्याची उर्मी येते. ते स्थान व्यायाम करण्यासाठीच बनवलेले असते. घरी पुस्तक वाचायला बसलात, की तासाभरात झोप यायला लागते, पण ग्रंथालयात एवढ्या पुस्तकांच्या गराड्यात बसलेलो असतानाही झोप येत नाही. उलट त्या शांततेत मन एकाग्र होते. एवढेच काय, तर कोव्हीडमुळे वर्षभरात अनेकांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. परंतु ऑफिसमध्ये बसून काम करणे आणि घरी बसून काम करणे यात केवढे अंतर आहे, ते आपण सर्वांनीच अनुभवले. कामचलाऊ उपाय हे कायमस्वरूपी पर्याय ठरू शकत नाहीत. त्याचप्रमाणे मंदिर बंद असताना आपण देव्हाऱ्यातल्या देवापुढेच ध्यान लावून प्रार्थना केली. परंतु, जी अनुभूती मंदिरात येते, ती घरात येणे कठीण!

मंदिरे ही सार्वजनिक चार्जिंग सेंटर आहेत, असे म्हणायला हरकत नाही. मंदिरात चपला काढून, पाय धुवून मग प्रवेश करतो. मंदिराचा मोकळा सभामंडप आपले सगळे विचार विसरायला लावतो. आपण 'मी' मधून 'आम्ही'च्या विश्वात प्रवेश करतो. म्हणून तिथे गेल्यावर स्वतः साठी काही मागत न बसता, तिथली सकारात्मक ऊर्जा शक्य तेवढी शोषून घ्यावी. मंदिरे हे काही देवाकडे मागण्याचे ठिकाण नाही. ते विद्युत ऊर्जा केंद्र आहे. तिथे आपण सांसारिक प्रश्न घेऊन गेलो, तर मन:शांती कधीच लाभणार नाही. तिथल्या वातावरणाशी एकरूप होऊन उदबत्तीचा, धुपाचा, फुलांचा गंध घ्या. तिथल्या सकारात्मक लहरींशी मन जोडण्याचा प्रयत्न करा. देवासमोर तेवणाऱ्या मंद समईच्या प्रकाशात देवाची मूर्ती पहा आणि शांत चित्त लावून ध्यान धारणा करा. 

या सर्व गोष्टी घरात बसून अनुभवता येणार नाहीत. एकदा का मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली, की मन ही मंदिरासारखे भासू लागेल.