शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

Maha Shivratri 2021: महाशिवरात्रीला जागरण का करतात? काय आहे शंकराच्या तृतीय नेत्राचे महत्त्व? सांगत आहेत सद्गुरु!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 5:21 PM

Maha Shivratri 2021: शिवरात्रीची रात्र ध्यानधारणेची असून आपल्या हृदयात स्थित जीव आणि शिवाची सांगड घालून देणारी असते. तो अनुभव जरूर घ्या.

शिवरात्र, म्हणजे महिन्यातला चौदावा दिवस आणि अमावस्येच्या आदला दिवस. दर महिन्यात शिवरात्री येते. परंतु माघ मासात येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात. हा दिवस भगवान शंकरांच्या पूजेला समर्पित केला आहे. महाशिवरात्रीला दिवसभर उपास आणि रात्री जागरण या गोष्टीला महत्त्व दिले जाते. परंतु का? ते जाणून घेऊ. 

सद्गुरु सांगतात, उपासना करायची तर सुरुवात उपासाने करायला हवी. उपास कशाचा? तर ज्या गोष्टींमध्ये मन अडकलेले असते, अशा सर्व गोष्टींचा उपास. त्यातल्या त्यात आहारात आपले मन जास्त अडकलेले असते. भूकेवर नियंत्रण ठेवले, तर मन आहारात गुंतून राहत नाही. पोट रिकामे असले, की बुद्धी जड होत नाही. अन्य विचारांना चालना मिळते. ऐहिक सुखात गुंतलेले मन बाहेर पडून पारमार्थिक सुखाकडे झेपावते. म्हणून सुरुवात उपासाने. 

उपासाला उपासनेची जोड देण्यासाठी स्तोत्र, मंत्र, जप अशा धार्मिक गोष्टी सांगितल्या जातात. त्यामुळे देहाबरोबर मन विधींमध्ये गुंतून राहते आणि अन्य विचार डोक्यात शिरकाव करत नाहीत. म्हणून उपास, पूजा आणि विधी यांना महत्त्व आहे. 

परंतु जागरण का? कारण महाशिवरात्री हा उत्सव मुळात रात्रीचा आहे. भगवान शिवशंकर हा स्मशानात राहणारा, संसारात असूनही वैरागी वृत्तीचा, हलाहल पचवूनही समाधी अवस्थेत रमणारा देव आहे. त्याला दिवसाच्या कोलाहलापेक्षा रात्र प्रिय आहे. रात्रीच्या शांत वेळी जग झोपलेले असताना तो जागा असतो. जागे राहणे म्हणजे नुसते न झोपणे असे नाही, तर तो जागृत असतो, सावध असतो. महाशिवरात्रीचा उत्सव जागरणाच्या उपचारातून जागृत व्हा असा संदेश देतो. 

शिवशंकराला तीन डोळे आहेत असे आपण म्हणतो. पैकी तिसरा डोळा उघडला, तर प्रलय येईल असेही आपण ऐकले आहे. हा तिसरा डोळा केवळ प्रलय घडवण्यासाठी नाही, तर वाईट वृत्तीचा, विचारांचा, विकारांचा नाश करण्यासाठी आहे. तो केवळ शिवशंकराला नाही, तर आपल्या सर्वांना अदृश्य स्वरूपात आहे. शिवरात्रीच्या रात्री जागरण कराल, तेव्हा त्या तिसऱ्या डोळ्याने स्वत:च्या आयुष्यात डोकावून पहा. वाईट विकारांवर तृतीय नेत्रातून प्रहार करा. विकारी आणि अतिविचारी मनावर आवर घाला. 

शिवरात्रीची रात्र ध्यानधारणेची असून आपल्या हृदयात स्थित जीव आणि शिवाची सांगड घालून देणारी असते. तो अनुभव जरूर घ्या. दुसऱ्यांच्या आयुष्यात खूप डोकावून झाले, आता थोडे स्वत:च्या आयुष्यात डोकावून पहा. हा तिसरा डोळा तुम्हाला कायमस्वरूपी जागे करील. 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्री