शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यात का अडकतो ? वाचा... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 3:34 PM

प्रतिजन्मी आत्मघात झाल्याने `कोण करावे गणित' या चक्रवाढ व्याजी थाटात त्याच्या जन्म मृत्यूच्या चकरा चालूच राहतात. मग प्रश्न असा उरतो, संसारात वागावे कसे?

माणूस सर्वसाधारणपणे स्वत:च्या देहाचे व संसाराचे नको एवढे चिंतन करीत बसतो. त्यामुळे `जन्म होणे' यातच ईश्वरापासून तो दुरावलेला असतो. संसारी विषयांच्या चिंतनामुळे तो सतत त्याच विषयात अडवूâन राहतो. आशा आकांक्षाच्या बेड्या पायात अडकतात आणि त्या एका जन्मात पूर्ण होत नाहीत, म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. एकदा मेल्याने सुटेना, असे हे मरण आहे. 

आणखी जगणे नको, असा सूर लावणारे लोकसुद्धा यमराज दाराशी येताच पुढच्या दारी जा सांगतात. म्हणजेच मरणाची तयारी नाही आणि आनंदाने जगण्याची कला नाही. या द्वंद्वात मनुष्य झुरत राहतो. म्हणजे तो जिवंतपणी मरण अनुभवत असतो. कधी इच्छा, आकांक्षा, आवड अशा कितीतरी गोष्टींवर पाणी सोडत, तडजोड करत तो जगत असतो. परंतु या जगण्याला कोणी जगणे म्हणत नाही. ही फक्त आयुष्याशी केलेली तडजोड असते. श्रीमंती गाठीशी असूनही उपभोगता आली नाही, आनंदाचे क्षण असूनही ते ऐकायला आपली व्यक्ती नाही, समाजात मान सन्मान आहे, पण घरात काडीची किंमत नाही, हे जगणं मरणाहून वाईट आहे. त्यापेक्षा अध्यात्माच्या वाटेवर चालू लागाल. देहाची, मनाची आसक्त कमी करून, कर्म करा आणि निकाल भगवंतावर सोपवा. प्रतिजन्मी आत्मघात झाल्याने `कोण करावे गणित' या चक्रवाढ व्याजी थाटात त्याच्या जन्म मृत्यूच्या चकरा चालूच राहतात. मग प्रश्न असा उरतो, संसारात वागावे कसे? तर संत एकनाथ म्हणतात- 

ऐसे असावे संसारी, जोवरी प्राक्तनाची दोरी,पक्षी अंगणासी आले,आपला चारा चरोनि गेले,मुळी घराचार मांडिला,खेळ मोडोनि टाकिला,वाटसरू वाटा आले,प्रात:काळी उठोनि गेले,मार्गी बुहसाल भेटले,नाही मन तेथे गुंतले,एका विनवी जनार्दना,ऐसे असता भय कोणा।।

सत्संगतीने माणूस देहासक्ती कमी करू लागतो आणि ईशसेवेत आसक्ती वाढवू लागतो. हे मर्म आपण वेळीच समजून घेतले पाहिजे. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हटले आहे -

देहादीक प्रपंच हा चिंतियेला,परी अंतरी लोभ निश्चीत ठेला,हरीचिंतने मुक्तिकांता वरावी,सदा संगती सज्जनाची धरावी।। श्रीराम।।