शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
4
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
5
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
6
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
7
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
8
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
9
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
10
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
11
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
12
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
13
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
14
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
15
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
16
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
17
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
18
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
19
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
20
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम

बाळाचा दुग्धपान विधी का, केव्हा व कसा करावा? जाणून घ्या शास्त्रशुद्ध पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 4:25 PM

बालकास दूध पाजणे हा किती साधा प्रसंग! पण त्यालाही संस्कारबद्ध करून धर्मशास्त्राने औचित्य कसे साधले आहे पहा...

हिंदू धर्मात प्रत्येक क्षण सोहळ्यासारखा साजरा केला जातो. मग तोरण असो वा मरण. अर्थात आनंदाचे क्षण असो वा दु:खाचे!  थोडक्यात काय तर सर्वांनी सुख दु:खात सहभागी होऊन प्रत्येक क्षण साजरा करावा, अशी आपल्या धर्माची, संस्कृतीची इच्छा आहे आणि त्यानुसार आपल्या पूर्वजांनी नितीनियमांची आखणी केली केली आहे. यातच एक विधी असतो दुग्धपान विधी. तो कसा व कधी करायचा ते जाणून घेऊ. 

दुग्धपान या विधीमध्ये बालकास शंखाने गायीचे दूध पाजण्यात येते. हा विधी जन्मानंतर दुसऱ्या जन्मनक्षत्री किंवा एकतीस दिवसांनी अथवा त्यापूर्वी अगदीच जरूरीचे वाटल्यास एखादा शुभदिवस पाहून करावा.

या संस्कारात प्रथम कुलदेवता व परोहित यांची पूजा करावी. बालकास अभ्यंगस्नान घालून नूतनवस्त्रे व अलंकार घालावेत. बालकाचे मस्तक पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे करून त्यास शक्यतो उजव्या बाजूने शंखाने गायीचे दूध प्राशन करवावे. 

त्यापूर्वी शंख पाण्याने स्वच्छ धुवावा. या विधीसाठी नित्य वापरात नसलेला शंख तसेच वाजवायचा शंख घेऊ नये. त्याऐवजी चांदीचे गोकर्ण वापरावे. त्यावेळी रुढीनुसार काहीजण पुढील मंत्र म्हणतात-

नर्य प्रजां मे गोपाय, अमृतत्वाय जीवसे,जातां जनिष्यमाणां च, अमृते सत्ये प्रतिष्ठिताम् ।    

पय: पानेन हे बाल सुखं वर्धय मे गृहे,गोक्षीरेणाचिरेण त्वममृतत्व लभस्व च।

तसे पाहता बालकास गायीचे दूध पाजवणे हा किती साधा प्रसंग! पण त्यालाही संस्कारबद्ध करून धर्मशास्त्राने औचित्य साधलेले आहे. हे दुग्धपान संस्कारपूर्वक केल्यास बालकास नैसर्गिकरित्या दुधाची आवड निर्माण होते व ते मूल पुढे दुधाचा तिटकारा करत नाही. व त्याला दुधाची आवड लागावी म्हणून कसरतही करावी लागत नाही.