शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

दोन मिनिटं वेळ काढून 'या' आजीला मदत कराल का? कदाचित तुम्हालाच काही मदत मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 8:00 AM

कधी कधी दुसऱ्याला मदत केली की आपल्याला काहीतरी गवसल्याचा आनंद मिळतो. कसा ते बघा!

एक आजी घराच्या अंगणात सुई शोधत होती. त्या परिसरात अनेक लहान मुले खेळत होती. म्हाताऱ्या आजीला मदत करावी, या हेतूने मुले आजीच्या अंगणात आली आणि विचारू लागली,'आजी, काय शोधते?''लेकरांनो, माझी सुई हरवली आहे, तुम्ही पण शोधायला मदत करता का?'होsss म्हणत, सगळी मुले बारकाईने सुईचा शोध घेऊ लागली. आजीसुद्धा त्यांच्या बरोबर कंबरेत वाकून सुई शोधत होती. बराच वेळ झाला, तरी मुले घरी आली नाहीत पाहून मुलांच्या आया त्यांना हुडकत आजीच्या घरापर्यंत पोहोचल्या. आजींच्या सांगण्यावरून त्याही सुईचा शोध घेऊ लागल्या. 

आजीच्या अंगणात बायका-मुलांची जमा झालेली गर्दी पाहून वाटसरूंनीदेखील कुतुहलाने विचारले, 'आजी, एवढा कसला शोध घेताय?' आजीने त्यांनाही उत्तर दिले.

एक वाटसरू छद्मीपणे हसत म्हणाला, 'सुईच हरवली, त्यात काय एवढी शोधाशोध करायची? एवढ्या शुल्लक बाबीसाठी आजीने सगळ्यांना वेठीस धरून ठेवले.' तर दुसरा वाटसरू, प्रसंगाकडे दुर्लक्ष करून निघून गेला. तिसरा वाटसरू मदतीसाठी पुढे आला आणि म्हणाला, 'आजी, सुई नेमकी कुठे पडली आहे?'

वैतागलेली आजी त्याच्या अंगावर ओरडून म्हणाली, 'सुई कुठे पडली हे माहीत असते, तर एवढी शोधाशोध केली असती का? तुला मदत करायची तर कर नाहीतर जा.' आजीचे खवचट बोलणे ऐकून वाटसरू वैतागला. त्याने पुन्हा आजीला विचारले, 'अहो आजी, कुठे पडली याचा अर्थ, तुम्ही कुठे बसला होतात, तेव्हा पडली?'

'अच्छा असे होय? मी माझ्या झोपडीत शिवणकाम करत बसले होते, तेव्हा अचानक सुई कुठे पडली कळलेच नाही.' आजींनी उत्तर दिले.हे ऐकून सगळ्यांनी कपाळाला हात लावला. बायका तर जवळजवळ आजीच्या अंगावरच धावून गेल्या आणि म्हणाल्या, 'अहो आजी, सुई आत पडली, तर बाहेर का शोधताय?'

आजी म्हणाली, 'काय करू पोरींनो, झोपडीत उजेड नाही, मग तिथे शोधून कशी सापडणार? म्हणून अंगणात आले. सूर्यास्ताआधी मला सुई शोधली पाहिजे, तुम्ही पण शोधा पटापट!'

वाटसरू म्हणाला, 'आजी, सुई अंगणात पडलीच नाही, तर इथे तिचा शोध घेऊन काय उपयोग? उलट झोपडीतच तुम्हाला तुमच्या सुईचा शोध घेतला पाहिजे. थांबा, मी दुकानदाराकडून एक मेणबत्ती आणि दिवे घेऊन येतो. त्या प्रकाशात आपण तुमची सुई शोधू.'

आजी बर म्हणाल्या. वाटसरू मेणबत्ती आणि दिवे घेऊन आला. त्या मिणमिणत्या प्रकाशात त्याने पेरभर उंचीची सुई शोधून काढली. ती सुई घेऊन तो आजीकडे आला. सुई दिली आणि म्हणाला, आजी जिथल्या वस्तू तिथेच शोधायच्या असतात. दुसरीकडे त्याचा शोध घेऊन कसे चालेल? यावर आजीबाई म्हणाल्या,

'मुलांनो, तुम्ही सगळे जण सुखाच्या शोधात अंगणात चाचपडत फिरत आहात. मलाही तुम्हाला झोपडीचा मार्ग दाखवायचा होता. सुई शोधण्यासाठी तुम्ही झोपडी दिव्यांनी उजळून टाकली. मेणबत्तीच्या प्रकाशात सुक्ष्म सुई शोधून काढलीत. आयुष्यातही तुमची आंतरिक झोपडी जेव्हा झाकोळली जाईल, तेव्हा ती आत्मविश्वासाच्या दिव्यांनी प्रकाशित करा, तुमची हरवलेली सुई तुम्हाला नक्की सापडेल.'

आजींच्या कथेवरून सर्वांना बोध मिळाला, 'तुज आहे, तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी!'

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी