शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कर्जमुक्तीसाठी शास्त्रोक्त पद्धतीने केली जाते हनुमंताची पूजा; वाचा विधी व मंत्रासह सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 8:00 AM

हनुमानाची उपासना कोणी अध्यात्माच्या प्राप्तीसाठी करतं तर कोणी भौतिक सुखासाठी. ज्याची जशी भक्ती, तशी फलप्राप्ती होते.

हनुमान उपासनेची एक सर्वसामान्य पूजापद्धती ठरलेली आहे. उपासक आवश्यकतेप्रमाणे हनुमानाची दोन स्वरूपात उपासना करताना आढळतात. एक 'आपत्तीनिवारक वीररूप' आणि दुसरी `सुख-समृद्धी दासरूप.' वीररूपाची उपासना राजसोपचारांनी केली जाते. तर दासरूपाची सात्विक उपचारांनी.हुमानाच्या उत्सवाच्या वेळी मूर्तीला पंचामृताने स्नान घालतात. तत्पूर्वी तिळाच्या तेलात शेंदूर मिसळून त्याचे मूर्तीच्या सर्वांगाला लेपन करतात. नित्य उपासनेच्या वेळी मात्र शुद्ध जलाने स्नान घातले जाते. केशराबरोबर रक्तचंदन उगाळून त्याचे गंध रेखतात. हनुमानाला शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाची आणि आकाराने मोठी फुले वाहतात.

प्रात:पूजनाच्या वेळी गूळ, नारळ आणि लाडू यांचा नैवेद्य दाखवावा. माध्यान्ही गूळ, तूप व गव्हाचा चुरमा किंवा रोट नैवेद्यासाठी तयार करावेत. सायंकाळी आंबा, केळी व पेरू हनुमानाला अर्पण करावेत.

चुरमा दररोज करणे शक्य नसेल, तर आठवड्यातून निदान मंगळवारी तरी अवश्य करावा. तोच प्रसाद भक्षण करून एकभुक्त राहावे. हे मंगळवारचे `भीमव्रत' मौन पाळून, डाव्या हाताने भोजन करून केले, तर सहा महिन्याचे आत व्यक्ती कर्जमुक्त होते.

तुपात भिजवलेल्या एक किंवा पाच वाती हनुमानपुढे प्रज्वलित कराव्यात. उत्सवाच्या वेळी ५,१०,५०, १०८ यापैकी शक्य होतील तेवढ्या वाती लावाव्यात. त्यावेळी शंख, घंटा, नगारा इ. वाद्ये वाजवावीत.

वाचिक (ज्यात उच्चारण ऐकू येईल असा), उपांशु (ओठ हालताना दिसतील पण शब्द ऐकू येणार नाही असा), मानसिक (मनोमन केला जाईल असा) त्रिवीध पद्धतीने हनुमानाच्या मंत्राचा जप केला जातो. या मंत्रजपाच्या वेळी ध्यानधारणाही तेवढीच महत्त्वाची आहे.

उद्यन्मार्तण्डकोटिप्रकटरुचियुक्तं चारुवीरा सनस्थंमौज्जीवज्ञोपवीतारुणरुचिरशिखाशोभितं कुण्डलाङमभक्तानामिष्टदं तं प्रणतमुनिजनं वेदनादप्रमोदंध्यायेद्देवं विधेयं प्लवंगकुलपतिं गोष्पदीभूतवार्धिम

हा श्लोक म्हणून उपासना पूर्ण करावी.