शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

नवरा बायकोच्या बिघडत्या नात्यावर श्रीकृष्ण उपासना निश्चित ठरते फलदायी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 11:48 AM

नात्याला अध्यात्माचे कोंदण मिळाले, तर वाईट शक्तींचा प्रभाव नात्यांवर पडत नाही.

नवरा बायकोचे नाते अतिशय नाजूक. दोन कुटुंबातून आलेल्या दोन व्यक्तींचे परस्परांशी पटणे, पटवून घेणे आणि एकमेकांना समजून घेणे यात बराच कालावधी लागतो. तोवर श्रद्धा आणि सबुरी बाळगावी लागते. तसे न केल्यास नाते विकोपाला जाते. परंतु दोघांमध्ये प्रेम हा जोडणारा धागा मजबूत असेल, तर कितीही भांडणे होवोत पण 'तुझं माझं पटेना, तुझ्यावाचून करमेना' अशी स्थिती होते. हे प्रेम अधिक वृद्धिंन्गत व्हावे, यासाठी शास्त्रात दिलेले उपाय अवश्य करून पहा. 

>> पितृदोषाने जर घरामध्ये कलह होत असेल तर सर्वप्रथम पितृदोषाचे निरसन करावे. कुलदेवतेच्या दोषाने कलह होत असेल तर कुलदेवतेच्या दोषाचे निरसन करावे. वास्तुदोषाने कलह होत असेल तर वास्तुदोषाचे निरसन करावे.

>> अनिष्ट ग्रहांमुळे पती पत्नींमध्ये भांडणे होत असल्यास त्या ग्रहाचे जप, होमहवन, दानधर्म करावे. श्रीगुरुचरित्र, स्वामीचरित्र, कलियुगाचे इच्छितदाता, साईचरित्र, श्री गुरुलिलामृत किंवा सतपुरुषाचे चरित्र वाचन करावे.

>> भांडणे घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या जोडप्याने  किंवा दोघांपैकी एकाला घटस्फोट घेण्याची इच्छा असल्यास खालील संकल्प करून एकनाथ महाराजलिखित रुक्मिणी स्वयंवराचे पारायण करावे. संकल्प अशा पद्धतीने करावा-

मम वैवाहिक जीवन कर्माणि उत्पन्नांना विविध प्रत्यवायांनासमूल परिहारपूर्वक पुन: मिलन सिद्धी द्वारा अद्यारंभ करिष्ये।।

हा श्लोक म्हणून श्रद्धापूर्व रुक्मिणी स्वयंवर वाचावे. पूर्ण पोथी शक्य नसेल, तर रोज किमान एक अध्याय तरी जरूर वाचावा.

>> दोघांनी किंवा दोघांपैकी एकाने सोळा सोमवारचे व्रत करावे. सोमवारी संधीकाळात, सोमप्रदोषकाळात आणि शिवरात्रीला शिवमंदिरात जाऊन एक नारळ अर्पण करून कणकेचा साजुकतुपाचा दिवा लावून एक मूठ नागकेशर शिवपिंडीवर अर्पण करावे.

>> काही वेळा स्त्रीचा काहीही दोष नसताना तिचा पती दुसऱ्याच्या नादी लागून त्यांच्या प्रपंचात काडीमोड घेत असेल, सतत भांडणे होऊन दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला असेल तर स्वामी समर्थांची उपासना करा. तसेच अशा बाबतीत श्रीकृष्णाची उपासनाही फलदायी ठरते. ओम नमो भगवते वासुदेवाय, हा मंत्र जप किंवा विष्णुसहस्त्रनाम पठण करावे. त्याचा निश्चित परिणाम होतो. ही उपासना शीघ्रफलदायी असल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. कारण श्रीकृष्ण हा स्त्रीभोक्ता नसून स्त्रीरक्षणकर्ता आहे.