योग मुद्रांच्या बाबत आपण अनेक गोष्टी ऐकल्या असतील. योगाभ्यास करतानाही त्याचा उपयोग होतो. त्याबरोबरच मानसिक ताकद वाढवण्यासाठी कुबेर मुद्रा कशी वापरायची ते जाणून घेऊ.
कुबेर स्वामी ही भौतिक सुखाची देवता. विशेषतः संसारी मनुष्याला याच सुखाची तीव्र इच्छा असते. भौतिक सुखाची प्राप्ती व्हावी आणि सुखासीन आयुष्य जगता यावे, यासाठी मनुष्य जन्मभर मेहनत करतो. सद्यस्थितीत मनी मेकिंग अर्थात पैसे कमवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहे. तरीदेखील सगळ्यांच्याच प्रयत्नांना यश येतेच असे नाही. अशा वेळी अन्य पर्यायांची मदत घ्यावी लागते.
अशातच योगाभ्यासात मनाची तीव्र इच्छा, जिला आपण विल पॉवर असेही म्हणतो, ती वाढवण्यासाठी कुबेर मुद्रा रोज करा असे सुचवले आहे. त्यासाठी काळ, वेळ, स्थळाचे बंधन नाही. हवीत ती फक्त तुमची १७ सेकंद!
>>कुबेर मुद्रा करण्यासाठी दोन्ही हाताची पहिली तीन बोटं घट्ट बंद करा.
>>१७ सेकंद ही मुद्रा तशीच ठेवा आणि पूर्ण लक्ष श्वासांवर देऊन १७ सेकंदभर आपल्या इप्सित मनोकामनेबद्दलच बोला.
>>या १७ सेकंदात तुमचे मन इतरत्र भरकटता कामा नये.
>>त्यासाठी मन शांत असेल अशीच वेळ निवडा.
>>हा उपाय दिवसातून फार तर दोनदा करा, त्यापेक्षा जास्त नाही.
>>हा उपाय सलग १७ दिवस केल्याने आपल्याला इच्छेशी संबंधित सकारात्मक घटना घडताना दिसतात.
>>कुबेर मुद्रा करताना तन-मन एकाग्र झाले, की आपल्या इच्छेची तीव्रता आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते आणि त्यादृष्टीने सकारात्मक बदल दिसू लागतात.
>>परिणामी इच्छापूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरु होत.
तुमचे सुख पैशात असो, आरोग्यात असो नाहीतर अध्यात्मात असो, जी इच्छा प्रबळ मनाने व्यक्त कराल, ती नक्की पूर्ण होईल.