शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

योग – बहरण्याचे एक अद्वितीय तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 5:39 PM

योग मार्गावर, देव म्हणजे जीवनाचा स्त्रोत म्हणून पाहिले जात नाही, तर जीवन बहरण्याचे एक अद्वितीय तंत्रज्ञान म्हणून पाहिले जाते.

सद्गुरू: फुल हे अध्यात्माच्या परमोच्च अवस्थेचे योगिक प्रतीक आहे कारण योग मार्गावर वाटचाल करत असताना परमेश्वराकडे जीवनाचा निर्माता, स्त्रोत किंवा बीज म्हणून नाही, तर परमोच्च अवस्थेत बहरण्याचे स्थान या दृष्टीने पाहिले जाते. तुम्ही कोठून आलात यात योगाला काहीही स्वारस्य नाही. तुम्हाला कोठे जायचे आहे यातच योगाला स्वारस्य आहे. पण जे घडणार आहे त्याकडे आपण जे आहोत त्यावाचून हाताळू शकत नाही. जे आहे त्यात आपण आपल्यासाठी एक अवकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. अन्यथा आम्हाला काय आहे किंवा काय होते यामध्ये स्वारस्य नाही. पुढे काय घडणार आहे यामध्ये आम्हाला स्वारस्थ्य आहे.

बीजाची जोपासना

आम्ही जीवनाकडे अशा प्रकारे पाहतो ज्याला प्रत्येकजण पिता म्हणून संबोधतो, आम्ही त्याच्याकडे पिता म्हणून पाहत नाही. आम्ही आमचा वंश सोडून देत आहोत हा याचा अर्थ आहे. आम्ही परमेश्वरकडे अशी एक गोष्ट म्हणून पहातो ज्याला तुम्ही गर्भात धारण करू शकता. तुम्ही त्याचे पोषण केले, तर तो तुमच्यापर्यन्त पोहोचेल. जर तुम्ही त्याची जोपासना केली नाही तर ते बीज आहे तसे बीज म्हणूनच राहील.

आम्हाला फक्त फुलाचे सौन्दर्य आणि सुवास, तसेच फळाचे पोषण आणि माधुर्य हवंय म्हणून केवळ यासाठीच आपण बीजात स्वारस्य आहे. ते जर तसे नसते, तर आपल्याला त्या बीजात काहीच स्वारस्य उरले नसते. योगाचे अवघे विज्ञान, ज्याला आपण अध्यात्म म्हणतो ती संपूर्ण प्रक्रिया ही केवळ आपल्या जीवनाची योग्य प्रकारे निगा राखणीची कला आहे – म्हणजे बीजाची जोपासना करणे जेणेकरून त्याचे रूपांतर पूर्णतः बहरलेल्या फुलात होईल.

म्हणूनच योगी जणांनी तुम्हाला डोकं खाली पाय वर करायचा सराव करायला सांगितला! सुखावह स्थिती पेक्षा असुविधाजनक स्थितीत असताना तुम्ही कदाचित सत्य अधिक उत्तम दृष्ट्या पाहू शकाल. योग हे आंतरिक सर्वच पातळीचे रुपांतरणाचे विज्ञान आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कोणतीही एक विशिष्ट साधना करत असताना – त्यात असणार्‍या मूलभूत गुणांमुळे परिवर्तन घडू शकत असले – तरीही तेच म्हणजे सर्वस्व नाही. तुम्ही ती साधना कशा प्रकारे करता हे अतिशय महत्वाचे आहे.

एखादी पद्धत जर खरोखरच एक प्रभावी पद्धत बनायची असेल, तर सर्वप्रथम, तुम्ही तिचा वापर करून घेण्यासाठी तुमच्या मनाची तयारी करणे अत्यावश्यक आहे. तरच ती एक पद्धत म्हणून कार्य करू शकेल. निश्चित कालावधीसाठी विनाअट, तिच्याप्रती पूर्णतः प्रतीबद्ध होऊन ती आध्यात्मिक प्रक्रिया सुरू करणे हे नेहेमीच चांगले असते – सहा महीने केवळ साधना करत रहा. तुम्हाला कोणतेही फायदे मिळण्याची आवश्यकता नाही. फक्त ती साधना करत रहा. त्यानंतर, तुमच्या आयुष्याचे पडताळून पहा आणि आपण किती शांत, आनंदी आणि समाधानी झाला आहात हे पहा. तुमच्यासोबत हे कशामुळे होत आहे?

आंतरिक प्रकाश

अल ग्रेको नावाचा एक स्पॅनिश चित्रकार होता. वसंत ऋतुमधील एका सुंदर सकाळी तो घराच्या सर्व खिडक्या बंद करून बसला होता . त्याचा मित्र आत आला आणि म्हणाला, “तू सर्व खिडक्या बंद करून का बसला आहेस? चल, आपण बाहेर जाऊ. चल. बाहेर किती सुंदर वातावरण आहे, किमान खिडक्या तरी उघड.” त्याने उत्तर दिले, “मला खिडक्या उघडायच्या नाहीत कारण आतला प्रकाश चमकतो आहे. त्यात बाहेरील प्रकाशाने व्यत्यय आणावा असे मला वाटत नाही.”

तर, बीजाची जोपासना करून त्याचे रूपांतर फुलात होण्यासाठी, आपल्याला दिव्यांचा प्रकाश पाडावा लागतो का? नाही. प्रकाश पडलेलाच असतो. फक्त एवढंच की त्याच्यावर इतका मळ साचलेला आहे, त्याला बाहेर पडण्याची वाट सापडत नाहीये. एकदा हा प्रकाश आतून चमकू लागला, तर उर्वरित सर्वकाही नैसर्गिकपणे घडू लागते. आपण ते अतिशय सहजतेने करू शकतो. ते त्वरित घडण्यासाठी आवश्यक असणारे आत्मिक तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यामुळे आपल्याला नैसर्गिक प्रक्रियेमधून जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही कारण त्यासाठी वेळ लागू शकतो. ज्याप्रमाणे त्यांच्याकडे जेनेटिक इंजिनियरिंग म्हणजे अनुवांशिक अभियांत्रिकी आहे, त्याप्रमाणे आमच्याकडे इनर इंजीनीरिंग म्हणजे आंतरिक अभियांत्रिकी आहे! ज्या नारळाच्या झाडावर नारळ उगवण्यासाठी आठ वर्षे लागतात, त्याच झाडावर एक ते दीड वर्षात नारळ येतात – हे अनुवांशिक अभियांत्रिकी. तेच इनर इंजीनीरिंगचे आहे – ज्यांना अन्यथा हे साध्य करण्यासाठी दहा जन्म घ्यावे लागले असते, ते एकाच जन्मात साध्य करता येईल!