शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

तूचि एक आधार ! कोरोनाचं विघ्न दूर करुन पुन्हा 'सुखकर्ता दु:खहर्ता'चा जयघोष होऊ दे...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 1:23 PM

हे महाराजा, तुझ्याच कृपेने कोरोना संकटाशी सामना करण्याचे सामर्थ्य आम्हास प्राप्त झाले होते. शास्त्रज्ञांनी कोरोना प्रतिबंधक लस तयार केली. त्यामुळे कोरोनाची लाट आटोक्यात येऊ लागली.

ठळक मुद्देहे ॐकार स्वरूप गणेशा, तुला नमस्कार असो. तूच प्रत्यक्ष ते तत्त्व आहेस. तूच केवळ कर्ता, धारण करणारा, विघ्ने नाहीशी करणारा आहेस. तूच खरोखर ते परब्रह्म आहेस. तूच साक्षात आत्मा आहेस.

- दा. कृ. सोमण

विघ्नहर्ता गणरायाच्या उत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर जगावरचे कोरोनाचे हे संकट दूर होऊ दे. आमच्या संसाराची घडी पुन्हा नीट होऊन आर्थिक विवंचना दूर होऊ दे.. हे साकडे घालणारी गणपती बाप्पाला मारलेली आर्त हाक...गणपती बाप्पा, आज मी तुला साकडे घालणार आहे. कारण तूच आमचा खरा आधार आहेस. आम्हाला माहीत आहे की, ‘आम्ही इथले मालक नाही आणि तू आमचा पाहुणाही नाहीस. खरं म्हटलं तर तूच या विश्वाचा मालक आहेस. आम्हीच पृथ्वीवर काही दिवसांपुरते आलेले पाहुणे आहोत.’ म्हणूनच तुला ही आर्त हाक मारीत आहोत. प्रार्थना करीत आहोत. नम्र विनवणी करीत आहोत.हे ॐकार स्वरूप गणेशा, तुला नमस्कार असो. तूच प्रत्यक्ष ते तत्त्व आहेस. तूच केवळ कर्ता, धारण करणारा, विघ्ने नाहीशी करणारा आहेस. तूच खरोखर ते परब्रह्म आहेस. तूच साक्षात आत्मा आहेस.हे बाप्पा, दरवर्षी न चुकता तू येतोस, आम्ही तुझे मोठ्या उत्साहात स्वागत करतो. तुझे षोड्शोपचारे पूजन करतो. तुझ्या स्तवनाची आरती करतो. भजन करतो. अथर्वशीर्षाचे पठणही करतो. तुला मंत्रपुष्पांजली अर्पण करतो. तुला आवडणाऱ्या मोदमयी मोदकांचा नैवेद्य अर्पण करतो. तुझ्या वास्तव्याने आम्ही आबालवृद्ध आनंदित होतो. जीवनातील दु:ख-चिंता सारेच विसरून जातो आणि अनंत चतुर्दशीचा दिवस येतो. तू आम्हाला आशीर्वाद देत आमचा निरोप घेतोस. तुझ्या विरहाने आम्ही खूप बेचैन होतो. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ अशी विनवणी करीत राहतो.हे गणराया, दरवर्षी आम्ही तुझी भक्तिभावाने तन्मय होऊन सेवा करीत असतो; पण गणेशा, मागच्या वर्षी तुझ्या आगमनापूर्वीच संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट आले. तुझे स्वागत कसे करायचे? पूजा कशी करायची?आप्तेष्ट-मित्रमंडळींना तुझ्या दर्शनासाठी कसे बोलवायचे? मोठी चिंता लागून राहिली होती. कोरोनामुळे आम्ही बाहेर जाऊच शकत नव्हतो. आमच्यापैकी काहींच्या घरी माणसे आजारी होती. काहींच्या घरची माणसे तर कायमची दुरावली होती. काहींची नोकरी गेली होती. मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली.हे गणेशा, तू दु:खहर्ता आहेस, तू सुखकर्ता आहेस, तू विघ्नहर्ता आहेस. मग कोरोनाचे हे महासंकट आमच्यावर का कोसळले? आमच्या हातून तुझी सेवा करण्यात काही चूक झाली का? अशी शंकाही आमच्या मनात आली. तरीही तुझ्यावरच्या प्रेमापोटी, श्रद्धेपोटी आम्ही आम्हाला सावरले. तूच दिलेल्या शक्तीमुळेच मागच्या वर्षी कोरोनाच्या महासंकटातही शिस्त व संयम पाळून आम्ही तुझे स्वागत केले. मिळेल त्या उपचाराने तुझे पूजन केले. निरोप देताना कोरोनाशी लढाई करून विजयी होण्यासाठी आशीर्वादही मागितला होता.हे महाराजा, तुझ्याच कृपेने कोरोना संकटाशी सामना करण्याचे सामर्थ्य आम्हास प्राप्त झाले होते. शास्त्रज्ञांनी कोरोना प्रतिबंधक लस तयार केली. त्यामुळे कोरोनाची लाट आटोक्यात येऊ लागली. तरीही भीती ही आहेच. आमची मने धास्तावलेली आहेत. तू बुद्धिदाता आहेस. तूच आम्हाला मनोबल प्राप्त करून दे. हे विनायका, यावर्षी अशा भयग्रस्त मनाने आम्ही तुझे स्वागत करीत आहोत. आर्थिक ओढाताणीचे दिवस आले आहेत. कित्येकांचे रोजगार बंद झाले आहेत. कित्येकांच्या घरातील आप्तेष्ट कोरोनामुळे दुरावले आहेत. अनेक दिवस घरातच राहिल्याने आमची मने अस्वस्थ झाली आहेत. भविष्यकाळाची चिंता लागून राहिली आहे.हे गौरीपुत्रा, आम्हाला तुझाच आधार आहे. तू विघ्नहर्ता आहेस. आमची विघ्ने तू दूर कर. तू दु:खहर्ता आहेस. आमची दु:खे दूर कर. तू सुखकर्ता आहेस. आम्हाला सुख प्राप्त होऊदे. तू वर्तमान, भूत आणि भविष्य काळाच्याही मर्यादेपलीकडील आहेस. तूच आमचा भविष्यकाळ उज्ज्वल कर. तू शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक शक्तींच्या ठिकाणी आहेस. तूच या शक्ती आम्हास प्राप्त करून दे. निर्मितीशक्ती, रक्षणशक्ती आणि संहारशक्ती ही तुझीच तीन रूपे आहेत. तूच सूर्य आहेस. तूच चंद्र आहेस. संपूर्ण निसर्ग तुझेच रूप आहे. नैसर्गिक संकटांपासून तूच आम्हास वाचवू शकतोस.हे गणनायका, यावर्षी तुझ्याकडे हेच आमचे मागणे आहे. आमच्या हातून चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा कर. यावर्षी अशी प्रार्थना करीतच आम्ही तुझे स्वागत करीत आहोत, तुझी मनोभावे षोड्शोपचारे पूजा करीत आहोत. सर्व नियम व शिस्त पाळूनच तुझा उत्सव साजरा करीत आहोत. आमची सहनशीलता आता संपली आहे. आमचा आर्थिक डोलारा कोसळला आहे. संसाराची घडी पार विस्कटली आहे. देवाधिदेवा, तू हे सर्व जाणतोस, म्हणूनच तुला आमची कळकळीची ही विनंती आहे. जगावरचे कोरोनाचे हे संकट दूर होऊदे. आमच्या संसाराची घडी पुन्हा नीट होऊदे. आर्थिक विवंचना दूर होऊ दे. हेच आमचे मागणे आहे. हेच आमचे तुला साकडे आहे.(लेखक पंचांगकर्ता आणि खगोल अभ्यासक आहेत.)

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGaneshotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवcorona virusकोरोना वायरस बातम्या