शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
3
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
4
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
5
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
6
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
8
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
9
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
10
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
11
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
12
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
13
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
14
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
15
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
16
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
17
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
18
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
19
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
20
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?

तुमचा वाढदिवस मार्चमध्ये असतो? मग असे आहे तुमचे व्यक्तिमत्त्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 10:16 AM

अंकशास्त्रानुसार मार्चमध्ये जन्मलेले लोक अतिशय उत्साही, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे, मित्रपरिवारात रमणारे आणि पर्यटनप्रेमी असतात.

आपली जन्मतारिखच नाही, तर आपला जन्ममासदेखील आपल्या व्यक्तीमत्त्वाबद्दल भाकित करतो. तुमचा वाढदिवस जर मार्चमध्ये असेल, तर तुमच्या व्यक्तिमत्त्वात पुढीलपैकी कोणकोणते गुण आहेत, हे तपासून घ्या आणि जे चांगले तुमच्यात नसतील, ते अंगी बाणून घेण्याचा प्रयत्न करा. 

तुमच्या अंगभूत कलागुणांची पटकन कोणाला कल्पना येणार नाही, परंतु जसाजसा व्यक्तिपरिचय होत जाईल, तस तसे तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल लोकांमध्ये आकर्षण वाढत जाईल. 

तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असता. त्यासाठी कष्ट सोसायची तुमची तयारी असते. कोणत्याही विषयावर मत प्रगट करण्याआधी तुम्ही त्या विषयाची सखोल माहिती घेता आणि मगच मतप्रदर्शन करता. या चांगल्या सवयीमुळे लोक तुमचे मत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. 

या महिन्यातील व्यक्तींमध्ये दोन गट पडतात. काही जण अतिशय रसिक असतात, तर काही अगदी विरुद्ध टोकाचे म्हणजेच अरसिक असतात. बाकी कशात रस नसला, तरी गप्पांमध्ये यांचा हातच काय, तर तोंडही कोणी धरू शकत नाही. त्यामुळे सण-समारंभात रंग भरण्याची जबाबदारी यांच्यावर येऊन ठेपते. ते समारंभाचा अविभाज्य भाग ठरतात.

या लोकांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. एकदा लागलेली सवय सोडवणे अतिशय कठीण जाते. आणि नशेमुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वातील चांगले गुण झाकोळले जातील व तुमची प्रतिमा मलीन होईल. यासाठी व्यसन आणि व्यसनी लोकांना चार हात दूर ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करा. 

या लोकांच्या मनात, डोक्यात विचारांची स्पष्टता नसते. ते सतत दोन दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपयशीदेखील ठरतात. मनात सतत द्वंद्व असल्यामुळे मन अस्वस्थ राहते, स्वभाव बिघडतो, चिडचिड होते आणि एकामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून अशा लोकांनी ध्यानधारणेवर भर दिला पाहिजे. 

तुमच्या द्विधा मनस्थितीमुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवताना घाबरतात. तुमचा निर्णय घटकेत कधी बदलेल, हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही. या स्वभावामुळे तुमची विश्वासार्हता कमी होते आणि लोक तुम्हाला ग्राह्य धरत नाहीत. यासाठी एका निर्णयावर ठाम राहणे, संयम बाळगणे, विचारपूर्वक काम करणे, या सवयी लावून घ्या. त्याचा उपयोग तुम्हाला करिअरमध्येही होईल. यशस्वी व्हाल आणि लोकांच्या नजरेतही तुमचे स्थान कायम कराल.

शुभ अंक : ३,७,९शुभ रंग : हिरवा, पिवळा, गुलाबीशुभ वार : शनिवार, रविवार, सोमवारशुभ कर्म : पाण्यात मध मिसळून रोज सूर्याला अर्घ्य द्यावे.

या महिन्यात जन्मलेली यशस्वी भारतीय व्यक्तिमत्त्व : डॉ. कल्पना चावला, मेरी कोम, स्मृती इराणी, अनुपम खेर, श्रेया घोषाल, आमिर खान इ.