आॅनलाईन लोकमतभंडारा : भंडारा व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा नदीवरील ईटान-कोलारी मार्गावरील बांधावयाच्या पुलाला १०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन केंद्रीय जहाज व रस्ते बांधकाम मंत्री ना. नितीन गडकरी यांनी दिले.आमदार डॉ. परिणय फुके, आमदार बंटी भांगडीया यांनी निवेदन देऊन या पुलाला निधीची मागणी केली, यावेळी ना. गडकरी यांनी आश्वासन दिले. ईटान कोलारी पुल निर्माण कृती समिती लाखांदूरचे राजेश महावडे, गिरीष भागडकर, तिलक वैद्य, राजू फुलबांधे, उध्दव कोरे यांनी आ. फुके यांना निवेदन दिऊन पुलाच्या बांधकामासाठी निधीची मागणी केली होती.लाखांदूर, ब्रम्हपूरी व पवनी तालुक्याला सुध्दा या पुलाचा फायदा होणार आहे.यावेळेस आ. परिणय फुके यांनी शासनाच्या कोणत्याही योजनेमधून निधी मंजूर करुन पुलाचे बांधकाम करण्यात येईल असे आश्वासन दिले.त्यानुसार २२ जानेवारीला ना. नितीन गडकरी यांची आ. डॉ. परिणय फुके व चिमूर क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी संयुक्तीक भेट घेतली व ईटान कोलारी पुलाच्या बांधकामाकरिता केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत १०० कोटी मंजूर करावे, अशी मागणी केली. त्यावर गडकरी यांनी पुलाच्या बांधकामाला १०० कोटी देणार असल्याचे आश्वासन आ. डॉ. परिणय फुके यांना दिले. त्यावेळी मध्यप्रदेशचे माजी मंत्री नानाजी मोहाड हे उपस्थित होते.
पूल बांधकामाला १०० कोटींचा निधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:32 AM
भंडारा व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा नदीवरील ईटान-कोलारी मार्गावरील बांधावयाच्या पुलाला १०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन केंद्रीय जहाज व रस्ते बांधकाम मंत्री ना. नितीन गडकरी यांनी दिले.
ठळक मुद्देईटान-कोलारीचा पूल : नितीन गडकरी यांचे परिणय फुके यांना आश्वासन