वीज बचतीला खो : ग्रामपंचायत तिजोरीत निधीचा ठणठणाट चुल्हाड (सिहोरा) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेची बचत करण्यासाठी सीएफएफ व एलईडी बल्प उपयोगात आणणारी संकल्पना मांडली असताना ग्रामपंचायतच्या तिजोरीत निधीच नसल्यामुळे सिहोरा परिसरातील गावात चक्क सार्वजनिक दिवाबत्तीत १०० व्हॅटचे बल्ब लावण्यात आले आल्यामुळे ‘मेक इन’ संकल्पनेची फसगत होणार आहे. राज्य शासनाची वर्षपूर्ती झाली असतानाही शासन स्तरावर ग्राम पंचायतींना अनुदान राशी उपलब्ध करण्यात आली नाही. यामुळे निधीअभावी ग्रामपंचायतच्या तिजोरीत ठणठणाट आहे. शासनाने १३ वा वित्त आयोग गुंडाळला असून १४ वा वित्त आयोगाची पुर्नबांधणी केली आहे. या आयोग अंतर्गत थेट निधी ग्राम पंचायतीना वळता करण्यात येणार असल्याचा उदोउदो करण्यात येत आहे. सामान्य फंडात खेळणारा निधी नाही. यामुळे चहा-पाणी बंद झाले आहे. ५० टक्के अनुदान राशी कर्मचाऱ्यांना देताना नाक तोंड दाबण्याची पाळी पदाधिकाऱ्यांवर आली आहे. गावागावांत विकासाचा अनुशेष २५ टक्के शिल्लक आहे. नाला सरळीकरण, पांदन रस्ते माती काम एक नव्हे दोनदा झाली आहेत. प्रशासकीय इमारती पूर्ण झाले आहेत. सिमेंट रस्ते बांधकामासाठी गावात जागा शिल्लक नाही. सभामंडपाचे बांधकाम वॉर्डावॉर्डात होत आहेत. परंतु उपयोग मात्र अल्प आहे. निधी खर्चाचा सदुपयोग होत नसल्याचे चित्र सिहोरा परिसरातील गावात दिसून येत आहे. परंतु महालगावच्या प्रवाशी निवाऱ्याला न्याय देता नाही. यामुळे नागरिकात रोष आहे.गावात सार्वजनिक दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. रात्री संपूर्ण गावात प्रकाश दिसून येत आहे. विजेचे देयक जिल्हा परिषद मार्फत देण्यात येत आहे. यामुळे ग्रामपंचायती टेंशन घेत नाही. गावकऱ्यांना प्रकाश देण्यासाठी ग्राम पंचायतीची धडपड सुरु झाली आहे. तिजोरीत निधी नसतानाही सरपंच तथा पदाधिकारी यांनी बल्प खरेदीचे प्रयत्न सुरु केली आहेत. स्वखर्चातून तथा उसनवारीवर स्वस्त दरात उपलब्ध होणारी बल्प खरेदीमधून दिलासा देण्यात येत आहे. १०० व्हॅटचे बल्प २० रुपयात प्राप्त होत असल्याने खरेदी केली जात आहे. कमी व्हॅटचे महागडे बल्प खरेदी करण्याची स्थिती ग्रामपंचायतीची नाही. सरासरी एक हजाराचे देयक करण्याची स्थिती नसल्याचे दिसून आले आहे. अल्प व्हॅटचे बल्प २०० रुपयात तथा या पुढील दरात प्राप्त होत आहेत. गावात अंदाजे ५० हून अधिक बल्प लावण्यात येत आहे. परंतु निधी नसल्याने महागडे बल्प खरेदी करताना डोळे वटारण्याची पाळी सरपंच व सचिवावर आली आहे. यामुळे अनेक वॉर्डात अंधाराचे साम्राज्य दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकल्पनेला गावात तिलांजली देण्याची पाळी ग्रामपंचायतीवर आली आहे. एरवी १५.२० व्हॅटचे बल्प यात लावले जात असताना १०० व्हॅटचे बल्पनी नाईलाजास्तव जागा घेतली आहे. यामुळे अतिरिक्त ८० व्हॅट अधिक वीज खर्च केली जात आहे. त्या बाबीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नाही. वसुली करताना निर्देशाचे पालन करण्यात येत आहे.
सार्वजनिक दिवाबत्तीत १०० व्हॅटचे बल्ब
By admin | Published: November 30, 2015 12:48 AM