पावसाळा पूर्व सर्वेक्षण : ११६ गावांना पिवळे कार्ड, ५४२ ग्रामपंचायतीला पाण्याच्या ६ हजार ५० स्रोतांची तपासणीदेवानंद नंदेश्वर भंडाराजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाद्वारे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पावसाळा पूर्व स्वच्छता सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. या सर्वेक्षणात ५४२ ग्रामपंचायती अंतर्गत ६,०५० पाण्याचे स्त्रोत तपासण्यात आले. यातील १०३ गावात पाण्याचे स्त्रोत दूषित आढळून आले. लाखांदूर तालुक्यातील मांदेड व विरली (बुज.) या दोन गावांना लाल कॉर्ड देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायतीं पैकी १०३ गावांत पाण्याचे स्त्रोत दूषित आढळले असून १०१ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले. या गावांना सलग पिवळे कार्ड मिळाल्यास त्यांना डेंजर झोनमध्ये टाकून रेड कार्ड दिले जातात. दोन वर्षे रेड कार्ड मिळाल्यास अशा ग्रामपंचायतचे अनुदान रोखण्याचे अधिकार प्रशासनाला असतात. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात केवळ नोंद असलेल्या पाण्याचेच स्त्रोत तपासले जातात. वास्तवात प्रत्येक ग्रामपंचायतीने आरोग्य विभागात पाण्याच्या स्त्रोतांची नोंद असेलच असे नाही. आरोग्य विभागामार्फत लाल कार्ड व पिवळे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित ग्रामपंचायतींनी पाण्याच्या स्रोतासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. - डॉ. आर. डी. कापगते, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी,असे दिले जाते कार्डजलस्रोत व्यवस्थित आढळून आल्यास हिरवे कार्ड दिले जाते. यासाठी गावाला पाणी पुरवठा होणाऱ्या संपूर्ण जलस्त्रोताची पाहणी केली जाते. सलग पाच वर्ष हिरवे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींना चंदेरी कार्ड दिले जाते. त्या गावात साथीचा आजार पसरलेला नसणे आवश्यक असते. गावातील ७० टक्क्यापेक्षा अधिक नागरिक ज्या विहिरी व हातपंपातील पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात त्या पाण्याचे स्रोत तपासले जातात. तपासात जोखीम आढळल्यास त्या ग्रामपंचायतीला लाल कार्ड दिले जाते. ४गावातील असुरक्षित पाणी पुरवठ्याची जोखीम ७0 टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास तीव्र जोखीम समजली जाते. ती ३0 ते ६९ टक्क्यापर्यंत असल्यास मध्यम जोखीम समजली जाते. स्रोताभोवती अस्वच्छता व दुर्गंधीयुक्त वातावरण असल्यास त्या गावांना पिवळे कार्ड दिले जाते.
१०३ गावांत दूषित पाण्याचे स्रोत, दोन गावांना मिळाले लाल कार्ड
By admin | Published: July 08, 2015 12:41 AM