भंडारा - आज आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनानंतर देण्यात आलेल्या दुपारच्या जेवणामुळे जवळपास ११५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून हे विद्यार्थी पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. या विद्यार्थ्यांवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून वृत लिहिपर्यंत रुग्णालयात दाखल करणाºया विद्यार्थ्यांची संख्या वाढतच होती. शनिवारी सकाळच्या सत्रात आदिवासी विकास विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनानंतर विज्ञान प्रदर्शनीची पाहणी करण्यात आली .यानंतर सर्वच खेळाडू व शिक्षकांना जेवण देण्यात आले. यात बहुतांश जणांना काही तासानंतर मळमळ वाटणे, डोकेदुखी व उलट्या होण्याचा त्रास झाला. दुपारी साडेतीन ते चार वाजतापर्यंत जेवण आटोपले. मात्र तोपर्यंत काही विद्यार्थ्यांना त्रास उद्भवल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. विशेष म्हणजे यात काही शिक्षकांनाही या विषबाधेचा फटका बसला. सदर विषबाधा अन्नातून व पाण्यातून झाल्याचे रुग्णालयात दाखल झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यातही पिण्यासाठी देण्यात येणारे पाणी संपल्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलातील जलकुंभाचे पाणी पिण्यासाठी दिले, असे खेळाडूंचे म्हणणे आहे. यातूनच या सर्वांची प्रकृती बिघडली. रात्री उशिरापर्यंत अस्वस्थ वाटणाºया विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणण्याचे कार्य सुरुच होते. यात १४ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले असून उर्वरीत विद्यार्थी व शिक्षकांना प्रथमोपचार करून जिल्हा क्रीडा संकुलात विश्रांतीसाठी पाठविण्यात आले. रुग्णालयात एकात्मिक प्रकल्प अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी भेट देत विद्यार्थ्यांची विचारपूस केली. यात त्यांनी खाल्लेले अन्न व पाणी यात दोष होता काय? याबाबत चौकशी केली.अपुरी व्यवस्थासदर विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी दोन हजार ७०० मुलांसह ३०० शिक्षकांनी सहभाग नोंदविला आहे. पाच जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होत असताना जिल्हा क्रीडा संकुलात स्पर्धेचे व्यवस्थापन ढासळल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांसाठी चटई, गाद्या व आरोच्या पाण्याची व्यवस्था अपुरी असल्याचेही खेळाडूंनी यावेळी सांगितले.
भंडारा येथे अन्नातून 115 विद्यार्थ्यांना विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 9:12 PM
विभागीय क्रीडा स्पर्धेतील घटना; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु
ठळक मुद्देदुपारच्या जेवणामुळे आज जवळपास १०६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली हे विद्यार्थी पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत