शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

रेतीचे अवैध ११ टिप्पर व चार ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 9:58 PM

रेती अवैध वाहतूक करणाऱ्या ११ टिप्परसह चार ट्रॅक्टर गुन्हे शाखेच्या पथकाने तुमरस ते भंडारा मार्गावर कारवाई करून गुरुवारी पहाटे ५ पकडले. टिप्पर चालकाजवळ मध्यप्रदेशातील वाहतूक परवाना आढळल्याने तो बनावट असण्याचा संशय पोलिसांना आहे. एलसीबीच्या या कारवाईने महसूल प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.

ठळक मुद्देएलसीबीची तुमसर येथे कारवाई : मध्यप्रदेशातील टीपी बनावट असण्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रेती अवैध वाहतूक करणाऱ्या ११ टिप्परसह चार ट्रॅक्टर गुन्हे शाखेच्या पथकाने तुमरस ते भंडारा मार्गावर कारवाई करून गुरुवारी पहाटे ५ पकडले. टिप्पर चालकाजवळ मध्यप्रदेशातील वाहतूक परवाना आढळल्याने तो बनावट असण्याचा संशय पोलिसांना आहे. एलसीबीच्या या कारवाईने महसूल प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असताना महसूल विभाग मात्र कोणतीच करवाई करताना दिसत नाही. अखेर आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भंडारा मार्गावर पहाटे ५ वाजता धाड मारून कारवाई केली. त्यावेळी टिप्पर क्र. एमएच ४९ टी ३३०३, एमएच ३६ एफ ८७८७, एमएच ४० एके ७५५३, एमएच ३६ एफ २०५०, एमएच ३१ सीक्यू. ७१६४, एमएच ३६ एफ १८०२, एमएच ३६ जी ८७००, एमएच ३४ एबी ५४४८, एमएच ४० बीजी २३५३, एमएच ४९ एटी ३१३२ यांना रेती वाहतूक करताना ताब्यात घेण्यात आले. तुमसर पोलीस ठाण्याच्या परिसरात जागेअभावी तुमसर बसस्थानक कार्यशाळेमागील परिसरात उभी करण्यात आली आहेत. यातील काही टिप्परमधून पाण्याची गळती सुरु होती. ओली रेती टिप्परमध्ये भरण्यात आली.तुमसर तालुक्यातील रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर क्र. एमएच ३६ झेड ०९३४, एमएच ३४ एल ८०२०, एम् एच ३५ जी ९१११ व एमएच ३५ जी ६७३७ यांनाही ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात सदर ट्रॅक्टर उभी करण्यात आली आहेत.सदर धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक पोटे, सहाय्यक उपनिरिक्षक प्रितीलाल रहांगडाले, पोलीस शिपाई सुधीर मडामे, कौशीक गजभिये यांच्या पथकाने केली. सदर वाहनचालकाजवळ मध्यप्रदेशातील टीपी आढळली. टीपीची सध्या तपासणी व चौकशी सुरु आहे. भंडारा येथील पोलीस अधिकाऱ्यांनी सदर धडक मोहीम राबविली. तुमसर येथील महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नियमानुसार सर्वप्रथम महसुल विभागने चौकशी करणे व कारवाई करण्याचा अधिकार आहे. परंतु महसुल प्रशासन रेती प्रकरणात कारवाई करतांनी दिसत नाही.