देवानंद नंदेश्वर
भंडारा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी, १८ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील ९५ केंद्रांमध्ये पार पडली असून, ११,९८९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा दिली.
इयत्ता पाचवी आणि आठव्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची परीक्षा देता येते. भंडारा जिल्ह्यात इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेकरीता ६,५५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५४ परीक्षा केंद्रांत ६४२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १३२ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता ५६७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४१ परीक्षा केंद्रांत ५५६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ११५ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांच्यासह चमूने परीक्षा केंद्रांना भेटी देवून पाहणी केली.