लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या प्रांगणावर आयोजित माळी समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १२ जोडपी विवाहबद्ध झाले.महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशिय विकास मंडळ तुमसरच्या वतीने रविवारला आयोजित विवाह सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नामदेव कामडे होते. अतिथी म्हणून खासदार मधुकर कुकडे, शिशुपाल पटले, जिल्हा परिषद सभापती रेखा ठाकरे, रमेश पारधी, विठ्ठलराव कहालकर, डॉ. पंकज कारेमोरे, अरविंद कारेमोरे, अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, जि.प. सदस्य रेखा भुसारी, डॉ. विजया नंदुरकर, कविता बनकर, नेपाल चिचमलकर, राजू कारेमोरे, नितीन निर्वाण, बंडू बनकर, गोसुलाल बघेले, तुकाराम राऊत, गणेश राऊत, सुभाष राऊत आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. श्रीकांत भुसारी यांनी विवाह सोहळ्यावर भरमसाठ होणारा खर्च टाळण्यासाठी माळी समाज बांधवांनी सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून खर्चावर आळा आणावा, यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचा प्रचार व प्रसार करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. नामदेव कांबडे यांनी सोहळ्याचे उद्घाटन केल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्यावर व जीवनपटावर प्रकाश टाकला. सामुहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थितांनी वºहाड्यांना यथोचित मार्गदर्शन केले.या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या १२ जोडप्यांना संसारपयोगी साहित्यांसह सावित्रीबाई फुले यांचे छायाचित्र व नूतन वर्षाचे कॅलेंडर वितरीत करण्यात आले.या विवाह सोहळ्याला जिल्ह्यासह परजिल्ह्यातील १० हजार समाजबांधव उपस्थित होते. सोहळ्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष गणेश राऊत, शंकर गिरडकर, जोशी नेरकर, मुरलीधर बनकर, अशोक बनकर, शालिकराम नंदरधने, तुलाराम बागडे, यादोराव बोरकर, माधवराव गायधने, चैतराम बनकर, लता किरणापुरे, ताराचंद कटणकार, छत्रपती कांबळे यांच्यासह डोंगरला येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले.
डोंगरला येथे १२ जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:31 AM
तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या प्रांगणावर आयोजित माळी समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १२ जोडपी विवाहबद्ध झाले. महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशिय विकास मंडळ तुमसरच्या वतीने रविवारला आयोजित विवाह सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नामदेव कामडे होते.
ठळक मुद्देमाळी समाजाचे आयोजन : जोडप्यांना संसारोपयोगी साहित्यांचे वितरण