लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : येथे सुमारे दीड कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले.मागील अनेक वर्षापासून दिघोरी येथे पशुवैद्यकीय दवाखान्याची मागणी होती. येथील पशुपालक खासगी डॉक्टरांकडून आपल्या पश्ुांचे उपचार करवून घेत होता व ते उपचार खूप महागडे पडत होते. आमदार बाळा काशीवार यांनी या पशुदवाखान्यासाठी प्रयत्न करून दवाखाना मंजूर करवून घेतला. त्यामुळे येथील व परिसरातील पशुपालकांनी त्यांचे आभार व्यक्त केले. राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चे लोकार्पण सोहळ्याचे वेळेस आमदार बाळा काशीवार, राजेश बांते, जि.प. सदस्य माधुरी हुकरे, सरपंच अरुण गभणे, पंचायत समिती सदस्य गुलाबराव कापसे, उपसरपंच रोहिदास देशमुख, जिल्हा पशुधन उपायुक्त डॉ.सतीष राजू, सहाय्यक पशुधन आयुक्त सुरेश कुंभरे, सहाय्यक आयुक्त विजय टंडन आणि दिघोरीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.सचिन राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच मोठ्या प्रमाणात पशुपालकांनी आपली उपस्थिती नोंदविली.
दीड कोटीच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 9:25 PM
येथे सुमारे दीड कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले.
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्य उपस्थिती