लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर : शिर्डीकडे भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकावर आल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या घटनेत १२ भाविक जखमी झाले. ही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास पिपरी पुनर्वसनजवळ घडली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना भंडारा येथील खासगी रूग्णालयात दाखल केले.जखमींमध्ये बसचालक शेख वकील शेख अहमद (६०), सागरसिंग स्वरजित सिंग राजपूत (२९), चंद्रशेखर राजपूत (४६), निलेशसिंग राजपूत (२६), महिमा गजराज सिंग कछुवा (१७), ऋती गजराज सिंग कछुवा (१६), अंकिता प्रल्हाद सिंग चंद्रेल (१६), दुर्गाबाई बघेल (६०), गजराजसिंग महिपालसिंग राजपूत (५२) सर्व राहणार डोंगरगढ. मोनाली परिहार (२०), विनिता परिहार (४५) रा. बालाघाट व कमला गौतम (६५) रा. गोंदिया आदींचा समावेश आहे.छत्तीसगढ राज्यातील डोंगरगढ येथील ट्रॅव्हल्स क्र. सी.जी.०८/एम-०४३१ ही बस देवदर्शनासाठी भाड्याने ठरविण्यात आली. बसमध्ये डोंगरगढ, बालाघाट व गोंदिया येथील एकाच कुटूंबातील २० ते २५ भाविक होते. सदर बस ही डोंगरगड येथून प्रवासासाठी निघाली होती.दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील जवाहरनगर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाºया पिपरी पुनर्वसन फाट्याजवळ येताच बसचे समोरील चाक दुभाजकावर चढल्याने चालकाचे स्टेअरींगवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला जावून उलटली. या घटनेत १२ प्रवाशी जखमी झाले. परिसरातील नागरिक तथा काही वाहनचालकांनी भ्रमणध्वणीवरून १०८ क्रमांकावर संपर्क साधून रूग्णवाहिका बोलावून जखमींना भंडारा येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी ट्रव्हल्स चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून तपास जवाहरनगर पोलीस ठाण्याचे हवालदार साखरे हे करीत आहेत.रिप्लेकटर लाईट बंदबºयाच दिवसापासून राष्ट्रीय महार्मगावर असलेल्या डिव्हायडरवरील सोलर रिप्लेकटर लाईट बंद आहेत. यामुळे वाहनचालकांना डिव्हायडरचा अंदाज येत नाही. याकडे हायवे मेन्टन्स अधिकाºयाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. नागपूर ते मुजबीपर्यंत असलेल्या महामार्गावर बरेच ठिकाणचे सोलर रिप्लेक्टर लाईट आजही बंद आहेत. कर्मचारी पाहणी करून जातात. परंतु, परिस्थिती जैसे-थे आहे
ट्रॅव्हल्स उलटून १२ भाविक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:48 PM
शिर्डीकडे भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकावर आल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या घटनेत १२ भाविक जखमी झाले.
ठळक मुद्देपिपरी पुनर्वसनजवळील घटना : जखमींवर रूग्णालयात उपचार