भंडारा : जिल्ह्यात मंगळवारी १२१० व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून १२२७ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला, तर १७ जणांचा कोरोनाने बळी घेतला. जिल्ह्यात सध्या १० हजार ७५७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. विशेष म्हणजे एकट्या भंडारा तालुक्यातून १५ हजार व्यक्तींनी आतापर्यंत कोरोनावर मात केली.
जिल्ह्यात मंगळवारी ४६७३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १२२७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्यात. भंडारा तालुका ६२९, मोहाडी ६३, तुमसर ७६, पवनी ६२, लाखनी १७४, साकोली ५८, लाखांदूर तालुक्यातील ६५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २१ हजार ६५४ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ४७ हजार २८० व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. तर ३५ हजार ७६८ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात १० हजार ७५७ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यात भंडारा तालुक्यात ५२२२, मोहाडी ६४५, तुमसर १३६१, पवनी ७१५, लाखनी १२८४, साकोली १०३४, लाखांदूर ४९६ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात १७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात भंडारा तालुक्यातील ९, मोहाडी, पवनी येथे प्रत्येकी २, लाखनी ३ आणि लाखांदूर येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक कोरोनामुक्त रुग्ण भंडारा तालुक्यातील आहेत. तालुक्यात १५ हजार ७७७ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. मोहाडी तालुक्यात २९९६, तुमसर ४४६१, पवनी ४२३०, लाखनी ३८३७, साकोली ३३४४, लाखांदूर १८२३ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे.
कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली
जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सुरुवातीला रुग्णवाढीची संख्या अधिक होती. मात्र आता रुग्णसंख्या कमी होऊन बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी १२१० व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून रुग्णांसाठी बेड व ऑक्सिजनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने जिल्ह्याला दिलासा मिळत आहे.