भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही अधिक आहे. जिल्ह्यात रविवारी १२३८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली तर १३६८ नवीन रुग्ण आढळून आले. २१ जणांचा कोरोनाने बळी घेतला.
जिल्ह्यात रविवारी ४७८५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ६७७, मोहाडी ९५, तुमसर १२९, पवनी ९६, लाखनी १४३, साकोली १५८ आणि लाखांदूर तालुक्यात ७० असे १३६८ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख १५ हजार ५३५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ४५ हजार ३२१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले तर ३३ हजार १८६ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली.
जिल्ह्यात २१ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ७१६ जणांचा कोरोनाने बळी घेतला. रविवारी भंडारा तालुक्यात १४, तुमसर २, पवनी ३, साकोली १ आणि लाखांदूर तालुक्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ११ हजार ४१९ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यात भंडारा तालुक्यात ५४५२, मोहाडी ७१७, तुमसर १३२५, पवनी ९०३, लाखनी १२९१, साकोली ११४१ आणि लाखांदूर तालुक्यातील ५९० व्यक्तींचा समावेश आहे.
बाॅक्स
सर्वाधिक भंडारा तालुक्यातील रुग्ण बरे
जिल्ह्यात आतापर्यंत ३३ हजार १८६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून त्यात सर्वाधिक १३ हजार ८९८ व्यक्ती भंडारा तालुक्यात कोरोनामुक्त झाले आहेत. मोहाडी तालुक्यात २८४२, तुमसर ४१७५, पवनी ३९६५, लाखनी ३५४४, साकोली ३१२६ आणि लाखांदूर १६३६ रुग्णांचा समावेश आहे.