चंदन मोटघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : लाखनी तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे ४३ गावामध्ये १०४ कामे सुरू आहेत. त्या कामावर १३ हजार २८५ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. मामा तलावाची शाळा काढणे, बंधाऱ्यातील गाळ काढणे, पांदण रस्ता सिंचन विहीर बांधकाम अशा विविध विकास कामे मग्रारोहयोद्वारे घेण्यात आली आहेत.एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत कामाची संख्या वाढली असून कडक उन्हाळ्यात मजूरवर्ग सकाळपासून कामावर जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. कामाच्या ठिकाणी मजुराच्या सुरक्षितता, संरक्षण, पिण्याचे पाण्याची सोय यांचा अभाव दिसून येत आहे.तालुक्यात जॉबकार्ड धारक नोंदणीकृत कुटुंब संख्या २९, ७२१ आहे. एकूण मजुर संख्या ८० हजार ५१७ आहे. रोहयो मजुरामध्ये महिलांची संख्या ५५ टक्के आहे. तालुक्यात रोहयो कामाने गती घेतली असली तरी पुरेशाप्रमाणात काम सुरू झालेली नाहीत. अनेक मजुर कामाच्या प्रतिक्षेत आहेत.तालुक्यात सावरी येथे मामा तलावाची गाळ काढणे, मानेगाव सडक येथे मामा तलावाचे गाळ उपसणे, पोहरा येथे तलावाची गाळ काढणे, सेलोटी येथे बंधाºयातील गाळ काढणे, पेंढरी येथे बंधाºयातील गाळ काढणे, कनेरी येथे नाला सरळीकरण, केसलवाडा वाघ येथे भात खाचरे, धानला येथे तलावाची गाळ काढणे, गडेगाव नाला सरळीकरण, किन्ही येथे लघुपाटबंधारे तलावाची गाळ काढणे, दैतमांगली मामा तलावाची गाळ काढणे, गोंडेगाव येथे बंधाºयातील माती काढणे, पिंपळगाव सडक येथे सिंचन विहीर, राजेगाव मामा तलावाची गाळ काढणे, निलागोंदी पांदण रस्त्याचे काम मासलमेटा येथे भुताई बोडीचे गाळ काढणे, केसलवाडा पवार येथे सिंचन विहिर बांधकाम होत आहे.परसोडी येथे तलावाची गाळ काढणे, मांगली येथे मामा तलाव गेट बांधकाम खातबोडी गेट बांधकाम, देवरीगोंदी येथे भात खाचरे, वाकल येथे पांदण रस्ता, पालांदूर येथे बंधाºयातील गाळ काढणे, कवलेवाडा येथे पांदण रस्ता, मामा तलावाची गाळ काढणे, खराशी पांदण रस्ता, खुनारी येथे नाला सरळीकरण झरप येथे पांदण रस्ता, रामपुरी येथे पांदण रस्ता, निमगाव येथे सिंचन विहिर बांधकाम, भुगाव मेंढा येथे पांदण रस्ता, डोंगरगाव साक्षर नाला सरळीकरण, सोमनाला येथे बंधाºयातील गाळ काढण्याचे काम होत आहे.रेंगेपार कोहळी येथे नाला सरळीकरण, धाबेटेकडी येथे सिंचन विहिर बांधकाम, शिवनी येथे नाला सरळीकरण, मोगरा येथे बंधाºयातील गाळ काढणे, मिरेगाव येथे नाला सरळीकरण, धोडेझरी येथे पांदण रस्ता, खेडेपार येथे पांदण रस्त्याचे मोरी बांधकाम, मचारणा येथे नाला सरळीकरण, मामा तलावाची गाळ काढणे, कोलारी येथे नाला सरळीकरण पाथरी येथे पांदण रस्त्याचे काम सुरू आहे.तालुक्यात रोहयोच्या कामांना गती मिळाली आहे. खंडविकास अधिकारी के.के. ब्राम्हणकर, सहायक खंडविकास अधिकारी मिलिंद बडगे, सभापती रविंद्र खोब्रागडे, उपसभापती घनश्याम देशमुख यांच्या देखरेखीखाली रोहयो कामे सुरू असून कामांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच जास्तीत जास्त मजुरांच्या हाताला काम मिळावे याकरिता प्रयत्नशिल आहेत. तालुक्यात रोहयो कामांवर मजुरांच्य सुरक्षिततेचा मुद्दा महत्वाचा आहे.
१३ हजार मजुरांना मिळाले काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 11:00 PM
लाखनी तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे ४३ गावामध्ये १०४ कामे सुरू आहेत. त्या कामावर १३ हजार २८५ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.
ठळक मुद्दे८० हजार नोंदणीकृत मजूर : पांदण रस्ते, तलावातील गाळ उपसण्याच्या कामांना प्राधान्य