शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

130 गावांना पुराचा धोका; लाईफ गार्ड, लाईफ जॅकेटसह रबर बोट तयार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 5:00 AM

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीसाठी संपूर्ण तयारी केली आहे. तालुकास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून ही यंत्रणा २४ तास अलर्ट राहणार आहे. तसेच प्रशिक्षण व बचाव साहित्याची चाचपणी करण्यासाठी प्रत्येक तालुकास्थळी माॅकड्रील घेतली जाणार आहे. संपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवून राहतील.

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : दरवर्षी वैनगंगा, चुलबंद, सूर, कन्हान, बावनथडी नद्यांचा भंडारा जिल्ह्यातील तब्बल १३० गावांना पुराचा फटका बसतो. दोन वर्षापूर्वी आलेल्या महापुराच्या अनुभवातून आता प्रशासन सतर्क झाले असून आता आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीसाठी संपूर्ण तयारी केली आहे. तालुकास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून ही यंत्रणा २४ तास अलर्ट राहणार आहे. तसेच प्रशिक्षण व बचाव साहित्याची चाचपणी करण्यासाठी प्रत्येक तालुकास्थळी माॅकड्रील घेतली जाणार आहे. संपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवून राहतील.

कोणत्या तालुक्यात किती गावांना पुराचा धोका? तालुका    धोका असलेली गावेभंडारा           २७मोहाडी         १७तुमसर          २४पवनी            ३३साकोली       ०३लाखांदूर       १८लाखनी        ०९

- बचाव पथकातील कर्मचारी लाईफ गार्ड यांना प्रत्येक तालुका ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

२५ बोट सज्ज, २५० लाईफ जॅकेट-  पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी २३ रबरी बोट, दोन फायबर बोट, २५० लाईफ जॅकेट आणि २०० लाईफ गार्ड सज्ज झाले आहे.-  उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांचे पथक पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना करणार आहे.

या ठिकाणी येतो पूर

भंडारा तालुक्यातील करचखेडा, पिंडकेपार, पहेला, कारधा, भंडारा शहर, पवनी तालुक्यातील पवनाखुर्द, जुनोना, मांगली, तुमसर तालुक्यातील कर्कापूर, सुकळी, रेंगेपार, बपेरा, मोहाडी तालुक्यातील मुंढरी, कन्हाळगाव, करडी, लाखांदूर तालुक्यातील आवळी, मासळ, सोनी या गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो.

बचाव साहित्य वितरित -  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने शुक्रवारपासून बचाव साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.-  पूरबाधित गावांना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचे पथक प्रत्येक पूरबाधित गावाला भेट देणार आहेत. जिल्हाधिकारी आकस्मिक भेट देणार आहे.

तालुका नियंत्रण कक्ष २४ तास अलर्ट- सात तालुका ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून तेथे पाच कर्मचारी राहतील- जिल्हा नियंत्रण कक्षातून सर्व सूचनांचे आदान-प्रदान पूरकाळात केले जाणार आहे.

 

टॅग्स :floodपूर