इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळा ऋतुला जेमतेम सुरूवात झाली असून जिल्ह्यातील प्रकल्पांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत १४ प्रकल्पांसह १८ माजी मालगुजारी तलाव ठणठणाट असून प्रकल्पांमध्ये नऊ टक्के जलसाठा शिल्लक आहे.जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागांतर्गत मध्यम, लघू व माजी मालगुजारी मिळून ६३ प्रकल्प आहेत. यापैकी चार मध्यम प्रकल्प असून त्यापैकी मोहाडी तालुक्यातील सोरणा मध्यम प्रकल्पात शुन्य टक्के जलसाठा आहे. चांदपूर जलाशयात ५.६८६, बघेडा ४२.८२ तर बेटेकर बोथली या मध्यम प्रकल्पात १.२२ टक्के पाणी शिल्लक आहे. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून त्यापैकी १३ प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. यात पवनारखारी, डोंगरला, टांगा, हिवरा, आमगाव, डोडमाझरी, मालीपार, शिवनीबांध, कुंभली, गुढरी, रेंगेपार कोठा व लाखनी तालुक्यातील खुर्शीपार लघु प्रकल्पाचा समावेश आहे. एकूण सर्व लघु प्रकल्पांमध्ये १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. २८ जुने मालगुजारी तलावांमध्ये ८.२४ टक्के पाणी शिल्लक आहे.१८ तलावात पाणीच नाहीलघु पाटबंधारे विभागांतर्गत २८ माजी मालगुजारी तलाव असून त्यापैकी १८ तलाव कोरडे आहेत. यात एकोडी, चांदोरी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, पाथरी, सावरबंध, परसोडी, खंडाळा, लवारी, उमरी, सितेपार, केसलवाडा, रेंगेपार कोहळी, कन्हेरी, चान्ना, डोंगरगाव, एलकाझरी व कोका तलावाचा समावेश आहे. माजी मालगुजारी तलावांच्या उत्थाना करिता कुठलीही पाऊले उचलले नाहीत. यासाठी राज्य शासनातर्फे निधी मंजूर करण्यात आला असला तरी तो अद्यापही अखर्चित आहे.
१४ प्रकल्प,१८ तलावात पाण्याचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:38 PM
पावसाळा ऋतुला जेमतेम सुरूवात झाली असून जिल्ह्यातील प्रकल्पांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत १४ प्रकल्पांसह १८ माजी मालगुजारी तलाव ठणठणाट असून प्रकल्पांमध्ये नऊ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
ठळक मुद्देप्रकल्पांमध्ये नऊ टक्के जलसाठा : मुसळधार पावसाची प्रतीक्षा