शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
3
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
4
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
5
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
6
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
7
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
8
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
9
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
10
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
11
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
12
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
13
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
14
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."
15
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
16
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
17
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
18
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
19
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
20
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

१.९० कोटी रूपयांच्या वाहनांसह १५ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:46 PM

सूर्यास्तानंतर रेतीचे उत्खनन करण्यात येऊ नये, असा नियम असतानाही बाम्हणी रेतीघाटावर बुधवारी मध्यरात्री २ वाजता मशीनच्या सहाय्याने रेती उत्खनन सुरू होते.

ठळक मुद्देरेती तस्करांचे धाबे दणाणले : तुमसर पोलिसांनी केली बाम्हणी रेतीघाटावर मध्यरात्री कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सूर्यास्तानंतर रेतीचे उत्खनन करण्यात येऊ नये, असा नियम असतानाही बाम्हणी रेतीघाटावर बुधवारी मध्यरात्री २ वाजता मशीनच्या सहाय्याने रेती उत्खनन सुरू होते. याची माहिती मिळताच तुमसर पोलीस पथकाने धाड मारून १०० ब्रास रेती दोन पोकलॅन्ड मशीन, नऊ ट्रक, एक ट्रॅक्टर असा १ कोटी ८९ लाख ४६ हजार रूपयांच्या मुद्देमालासह १५ जणांना अटक केली. याप्रकरणी भादंवि ३७९, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी बाम्हणी रेतीघाट सील करण्यात आला होता, हे विशेष.सुर्याेदयापूर्वी व सुर्यास्तानंतर रेतीचे नदीपात्रातून उत्खनन करता येत नाही. परंतु बाम्हणी रेतीघाटावर नियमाह्य रात्री दोन पोकलॅन्डने रेतीचे उत्खनन सुरू होते. याची गोपणीय माहिती बुधवारी रात्री तुमसर पोलिसांना मिळाली. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे, उपनिरीक्षक सुरेश हावरे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने धाड घातली. वैनगंगा नदीपात्रात दोन पोकलॅन्ड मशीनने रेतीचे उत्खनन सुरू होते. त्या सर्वांना ताब्यात घेऊन तुमसर पोलिसांनी कारवाई केली. रेती उत्खनन प्रकरणी आजवरची ही सर्वात मोठी कारवाई आहे.या कारवाईत पोकलँड (क्र. एएक्स २०० एलसी २००१-५८८५, एलसीएस १०० २०८४८) टिप्पर क्र.एमएच ३६/१२५४, एमएच ०६ एक्यु ४४२५, एमएच ३६ एफ ४४५७, एमएच ३६ एफ ५४३५, एमएच ३१ सीबी ३०३३, एमएच ४० एके ३५९१, एमएच ४० बीसी १६१९, एमएच ४० एके १४५९१, एमएच ३६ एफ १६८७, ट्रॅक्टर क्र.एमएच ३६ एल ८६५, डस्टर कार क्र.एमएच ३६ एच ६६११ असे १ कोटी ८९ लाख ४६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी जनवीर वकील अहमदखान रा.भंडारा, समीर नौशाद अहमद खान रा.भंडारा, अब्दुल आरीफ शेख रा.भंडारा, चंद्रकुमार गजभिये रा.सालेबर्डी, पवन नंदनवार रा.गणेशपूर, संजय वरकडे रा.किटाडी, राजेश वैरागडे रा.भंडारा, आदेश गोस्वामी रा.पलाडी, तुषार लुटे रा.किटाडी, भगवान बारई रा.पचखेडी, रामदास सोनवाने रा.गोटीटोक ता.रामटेक, शैलेश धांडे रा.माथनी ता.मौदा, रविंद्र वहाने रा.खुर्शीपार, बेनिराम हत्तीमारे रा.कळमना, दिनेश जामूनपाने रा.कळमना यांना अटक करण्यात आली. तुमसर शहरापासून चार कि़मी. अंतरावर वैनगंगा नदीपात्रातून मागील काही दिवसांपासून रेतीचा अवैध उपसा सुरू होता. येथे महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे रेती वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. यापूर्वी आ.चरण वाघमारे यांनी धाड टाकून हा रेतीघाट बंद केला होता. न्यायालयीन आदेशाने हा रेतीघाट सुरू झाला. येथे रात्रीबेरात्री रेती उत्खनन सुरू असल्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.