लोकमत न्यूज नेटवर्कजांब : मोहाडी तालुक्यातील लोहारा येथील टेंभरे हायस्कूल व महाविद्यालयाचे विद्यार्थी मानव विकास बसने शाळेमध्ये ये जा करीत आहे. मात्र बसफेरीचा मार्ग बदलल्याने १५४ विद्यार्थ्यांच्या अप-डाऊनला ‘ब्रेक’ लागला आहे.या शाळेचे विद्यार्थिनी व विद्यार्थी सुद्धा मानवविकास व अहिल्याबाई होळकर इयत्ता ५ ते ७ व ८ ते १२ पर्यंत चे विद्यार्थी १२३ मुली व २७ मुले या योजनेअंतर्गत मानव विकासच्या बसेसने ये-जा करीत आहेत. दिवाळीपूर्वी या बसफेरीचा मार्ग तुमसर-लोहारा-ताळगाव असा होता. या मार्गानी येणारी बस लोहारा शाळेत शिकणाºया मुली मुलाकरिता सोयीची होती. दिवाळीनंतर या बसचा मार्ग तुमसर गायमुख लेंडेझरी, रोंघा, पिटेसूर, लंजेरा, लोहारा, ताळगाव करण्यात आला. परिणामी लोहारा येथील विद्यार्र्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नवीन बसच्या मार्गामुळे विद्यार्थ्यांना सुटी झाल्यावर घरी जाण्याकरिता रात्रीचे ७.३० ते ८ वाजता असल्याने पालकांमध्ये असंतोष पसरला आहे. कधीकधी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याला मुकावे लागते. यामुळे परिसरातील पालकांनी शाळेत तक्रार केली. राज्य परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देवून मानव विकास बस फेरीचा मार्ग तुमसर - लोहारा - ताळगाव असाच ठेवावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी केला आहे.
१५४ विद्यार्थ्यांच्या अप-डाऊनला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:38 PM
मोहाडी तालुक्यातील लोहारा येथील टेंभरे हायस्कूल व महाविद्यालयाचे विद्यार्थी मानव विकास बसने शाळेमध्ये ये जा करीत आहे.
ठळक मुद्देप्रश्न मानव विकास बसफेरीचा : घरी पोहोचायला वाजतात रात्रीचे आठ