लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेला वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे १५७ गावांतील १,५१९.५० हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी धान, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान उन्हाळी धानाचे असून त्या पाठोपाठ आंबा आणि भाजीपाला पिकांचे आहे. महसूल विभागाच्या सर्वेक्षणाचा प्राथमिक अंदाज आला असून त्यात ही नोंद घेण्यात आली आहे.
जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी या दोन तालुक्यांमध्ये हे नुकसान अधिक आहे. प्रशासनाच्या १ मे ते ९ मे या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालातील आकडेवारीनुसार, मोहाडी तालुक्यातील १०७ गावे आणि तुमसर तालुक्यातील ५० गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये ४.३७३ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यात मोहाडी तालुक्यातील ३,४१८ आणि तुमसर तालुक्यातील ९५५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
धानावरोबरच आंबा व इतर फळपिके व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. अहवालानुसार, सध्या जिल्ह्यातील सर्व ७ तालुक्यांमध्ये सुमारे ७०,२२७ हेन्टर क्षेत्रावर शेतकयांनी उन्हाळी पिकांची लागवड केली, त्यापैकी १,५१९.५० हेक्टर क्षेत्रातील पिके नष्ट झाली आहेत.
पावसाने जनजीवन विस्कळीतमासळ : मासळ व परिसरात गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुमारे एक तास झालेल्या वादळी वाऱ्यासह धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी आली आहे. सध्या मासळ परिसरात मोठ्या प्रमाणात धान पीक कापणीला आले आहे. बप्याच शेतकयांनी धान पीक कापून शेतातच ठेवला होता. परंतु झालेल्या अवकाळी पावसाने धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. उमे धान, वादळी पावसाने खाली पडले असून उत्पादनात असलेले निश्चितपणे घट होणार आहे. ऐन हातात आलेले पीक अवकाळी पावसाने हिरावल्याने शेतकरी वर्गात चितेचे सावट पसरले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तलाठी, मंडळ अधिकारी यांनी तत्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.
शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशमोहाडी : तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. मोहाडी तालुक्यातील १०८ गावांतील पिकांचे पंचनामे तात्काळ करण्याबाबत तहसीलदार सुरेश वाघचौरे यांनी आदेश काढले आहेत. पंचनामे करताना मोहाडी तालुक्यासाठी नियुक्त केलेल्या विमा प्रतिनिधी यांना सोबत घ्यावे. कोणत्याही परिस्थितीत नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे शिल्लक राहणार नाही याची काळजी घेतली जावी. तातडीने कार्यवाही करुन संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी निर्देश दिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी लाभापासून वंचित राहिल्यास काही तक्रार प्राप्त झाल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शहापूर परिसरात अवकाळी पाऊसशहापूर : परिसरात सकाळपासून ढगाळ होते. सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. अध्र्ध्या तासाच्या अंतराने जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. विशेष करून शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका अधिक प्रमाणात बसला. अनेक ठिकाणी मंडप डेकोरेशन व्यावसायिकांना याचा तडाखा बसला, कार्यक्रमाच्या ठिकाणी उभे असलेले मंडप कोसळून पडले. अचानक झालेल्या पावसामुळे महामार्गावरील वाहतूकसुद्धा प्रभावित झाली दरम्यान हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरल्याचे चित्र आहे.