शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

१५८ गावात एनडीडीबीच्या पुढाकारातून ‘धवलक्रांती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 10:10 PM

प्रशांत देसाई ।आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पध्दतीने दुध उत्पादन सुरू आहे. आता शास्त्रोक्त पध्दतीचा वापर करून दुध वाढीसाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या (एनडीडीबी) योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत आहे. यासाठी एनडीडीबीने भंडारा जिल्ह्यातील १५८ गावांची तीन वर्षासाठी निवड केली आहे. जिल्ह्यातील दुध उत्पादनात भरभराट व्हावी, यासाठी भंडारा जिल्हा ...

ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : जनावरांचा आहार संतुलन कार्यक्रम, ‘लॅपटॉप’धारक प्रतिनिधींची मदत

प्रशांत देसाई ।आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पध्दतीने दुध उत्पादन सुरू आहे. आता शास्त्रोक्त पध्दतीचा वापर करून दुध वाढीसाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या (एनडीडीबी) योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत आहे. यासाठी एनडीडीबीने भंडारा जिल्ह्यातील १५८ गावांची तीन वर्षासाठी निवड केली आहे. जिल्ह्यातील दुध उत्पादनात भरभराट व्हावी, यासाठी भंडारा जिल्हा दुग्ध संघाने पुढाकार घेतला आहे.राष्टÑीय डेअरी विकास बोर्डाच्या योजनेतून ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. दुधाचे उत्पादन वाढावे, यासाठी एनडीडीबीने जनावरांसाठी आहार संतुलन कार्यक्रम आखला आहे. विदर्भात दुध व्यवसाय आजही पारंपरिक पद्धतीने केला जातो. गाय व म्हशी पोषकतत्त्वांकरिता जंगलातील किंवा पडीक जमीनीवर चराई आणि ढेप, चुन्नीसारख्या कृषी उत्पादनावर अवलंबून आहेत. अपुऱ्या पोषकतत्त्वांची गरज मिश्रीत पशुखाद्यातून पूर्ण होऊ शकते. त्यामुळे जनावरांना संतुलीत पोषण आहार देण्यात येणार आहे. या माध्यमातून दुध उत्पादक जनावरांना पारंपरिक पध्दतीने दिला जाणारा चारा बंद करून आवश्यक तेवढ्याच खाद्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी शेतकºयांना ‘मेजरिंग टेप’ जिल्हा दुध उत्पादक संघाच्या माध्यमातून पुरवठा करण्यात येणार आहे. यामाध्यमातून भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघ जिल्ह्यातील गावागावात दुध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.लॅपटॉपधारक प्रतिनिधी जाणार घरोघरीच्योजनेसाठी १५८ गावांमध्ये स्थानिय प्रशिक्षित प्रतिनिधींची (एलआरपी) मानधनावर निवड करण्यात येणार आहे. या प्रतिनिधींना १५ दिवसांचे निवासी प्रशिक्षण देऊन त्यांना ‘लॅपटॉप’ देण्यात येणार आहे. या लॅपटॉपवर जनावरांच्या आहार व दुध उत्पादनाच्या माहितीचीही नोंद राहणार आहे. या माध्यमातून हे प्रतिनिधी घरोघरी जावून शास्त्रोक्त माहिती शेतकऱ्याना देतील. या माध्यमातून दुध देणाऱ्या गायींची ओळख ‘बिल्ला’ लावून ते सॉफ्टवेअर प्र्रणालीत जोडण्यात येणार आहे.तालुकानिहाय आकडेवारीएनडीडीबीने निवड केलेल्या १५८ गावांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे - भंडारा ४२, लाखांदूर २०, लाखनी २१, मोहाडी २६, पवनी १८, साकोली २० आणि तुमसर तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे.सबसिडीवर होणार खाद्याचा पुरवठाया माध्यमातून शेतकऱ्यांना दुग्ध संघासोबत जोडण्यावर भर देण्यात येत आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना सबसिडीवर पशु औषधी, जनावरांचे खाद्य बाजारभावापेक्षा अल्प दरात पुरवठा करण्यात येणार आहे. जनावरांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाचा योग्य वापर व्हावा, यासाठी जनावरांच्या आवश्यक क्षमतेएवढाच खाद्य पुरवठा करण्याची ही योजना आहे. यामुळे कमी खर्चात संतुलित आहार, दुध उत्पादन, दुधातील फॅट आणि एस.एन.एफमध्ये वाढ होईल, जनावरांच्या प्रजनन क्षमतेत वाढ होईल.एनडीडीबीने निकषातून निवडले गावे२०११ च्या जनगणनेनुसार गावांची यादी भंडारा जिल्हा दुग्ध संघाने एनडीडीबीकडे पाठविली. यातील १०० लिटर व त्यापेक्षा अधिक दुध संकलन करणाऱ्या जिल्ह्यातील १५८ प्राथमिक दुग्ध उत्पादक सहकारी संघाची निवड एनडीडीबीने केली आहे. शेतकºयांना दुग्ध वाढीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन मिळावे, यासाठी दोन तज्ज्ञ प्रशिक्षक व एक पशुवैद्यकिय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकºयांना अद्ययावत माहिती देण्यात येणार आहे.पारंपरिक पीक पद्धतीसह दूध उत्पादन वाढण्यासाठी एनडीडीबीचा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्याधुनिक माहिती देण्याचा दूध संघाचा प्रयत्न आहे. या योजनेतून जिल्ह्याची दूध उत्पादनाची क्षमता वाढीस मदत होईल.- रामलाल चौधरी, अध्यक्ष, जिल्हा दुग्ध उत्पादक संघ भंडारा.शेतकऱ्यांची दूध उत्पादनात रूची वाढावी यासाठी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नियोजित पध्दतीने जनावरांना खाद्यपुरवठा करण्यात येत असल्याने खर्चाची बचत होईल. यातून कमी खर्चात चांगल्या प्रतीचे दूध उत्पादनासाठी मदत होईल.- करण रामटेके, कार्यकारी संचालक, दुग्ध उत्पादक संघ, भंडारा.