शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

१७ लाख ९१ हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:54 PM

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात १७ लाख ९१ हजार ६९२ मतदारांची नोंदणी झाली असून यात आठ लाख ९७ हजार ४४० पुरूष तर आठ लाख ९४ हजार २१२ महिला मतदारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी केली जाणार असल्याने मतदारांची संख्या वाढणार आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : आठ लाख ९७ हजार पुरूष तर आठ लाख ९४ हजार महिला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात १७ लाख ९१ हजार ६९२ मतदारांची नोंदणी झाली असून यात आठ लाख ९७ हजार ४४० पुरूष तर आठ लाख ९४ हजार २१२ महिला मतदारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी केली जाणार असल्याने मतदारांची संख्या वाढणार आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्र येतात. यात भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, साकोली आणि गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, तिरोडा व गोंदिया विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यात नऊ लाख ७७ हजार ६६४ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यात तुमसर मतदार संघात दोन लाख ९७ हजार ८७ मतदार असून एक लाख ५० हजार ७४५ पुरूष तर एक लाख ४६ हजार ३४२ महिला मतदार आहे. भंडारा मतदार संघात तीन लाख ६५ हजार ८४४ मतदारांची नोंदणी झाली असून एक लाख ८२ हजार ८५२ पुरूष आणि एक लाख ८२ हजार ९९२ महिला मतदार आहे. साकोली मतदार संघात तीन लाख १४ हजार ६८३ मतदार असून एक लाख ५९ हजार ५३८ पुरूष आणि एक लाख ५५ हजार १४५ महिला मतदारांचा समावेश आहे.गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदार संघात दोन लाख ५० हजार २५८ मतदार असून त्यात एक लाख २६ हजार २९४ पुरूष आणि एक लाख २३ हजार ९६४ महिला मतदार आहे. तिरोडामध्ये दोन लाख ५१ हजार १८९ मतदारांची नोंदणी झाली असून त्यात पुरूष एक लाख २४ हजार ५९१ आणि एक लाख २६ हजार ५९८ महिला मतदाराचा समावेश आहे. गोंदिया विधानसभा मतदार संघात तीन लाख १२ हजार ५९१ मतदार असून एक लाख ५३ हजार ४२० पुरूष तर एक लाख ५९ हजार १७१ महिला मतदार आहेत.विधानसभा क्षेत्रनिहाय सर्वात कमी मतदार अर्जुनी मोरगाव या मतदार संघात आहे. तर सर्वाधिक मतदार भंडारा मतदार संघात तीन लाख ६५ हजार ८८४ आहे. गत २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा एक लाख दोन हजार ४०८ मतदारांची वाढ झाली आहे. २०१४ मध्ये १६ लाख ८९ हजार २८४ मतदार होते. भंडारा जिल्ह्यात १२ हजार ९३७ नव मतदारांची संख्या आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.भंडारा, तिरोडा, गोंदियात महिला मतदार अधिकसाधारणत: पुरूष मतदार मतदारांची संख्या मतदार यादीत अधिक दिसून येते. परंतु भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील मतदार संख्येवर नेजर टाकल्यास भंडारा, तिरोडा आणि गोंदिया विधानसभा क्षेत्रात महिला मतदारांची संख्या पुरूषांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. गोंदिया विधानसभा क्षेत्रात पाच हजार ७५१, तिरोडा विधानसभा क्षेत्रात २००७ आणि भंडारा विधानसभा क्षेत्रात १४४ महिला मतदार पुरूषांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते.