लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : फायनान्स कंपनीकडून कर्जावर घेतलेल्या वाहनाचे हप्ते न भरता १७ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरुन येथील दोघांविरुध्द भंडारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहूल गोवर्धन भोंगाडे रा. सुभाष वॉर्ड भंडारा, गितेश रामचंद्र ठोमरे शक्तीनगर , खात रोड भंडारा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यादोघांनी येथील श्रीराम ट्रान्सपोर्ट व फायनान्स कंपनीकडून २ जानेवारी २०१६ रोजी वाहन खरेदीसाठी २१ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कराराप्रमाणे खरेदी केलेले वाहन फायनान्स कंपनीला गहान ठेवले होते. परंतू कर्जाच्या हप्त्याची परतफेड केलीच नाही. वारंवार मागणी करुनही हप्ते भरले नाही. तसेच गहान वाहनाचे ओरीजनल स्पेअरपार्ट काढून त्यात बदल केला. वाहनाचे मूल्य कमी करुन फसवणूक केली. तसेच परतफेडीची १७ लाख ५५ हजार ४७५ रुपये भरले नाही. त्यामुळे सदर कंपनीने न्यायालयात धाव घेतली. येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिका-यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. त्यावरुन याप्रकरणात दोघांविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक चौथनकर यांच्या तक्रारीवरुन भंडारा पोलीस ठाण्यात राहूल भोंगाडे व गितेश ठोमरे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फायनान्स कंपनीची १७ लाखाने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:07 PM
फायनान्स कंपनीकडून कर्जावर घेतलेल्या वाहनाचे हप्ते न भरता १७ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरुन येथील दोघांविरुध्द भंडारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देकर्जावर वाहन खरेदी : न्यायालयाच्या आदेशाने भंडारातील दोघांवर गुन्हा