लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज सोमवारला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वैध २४ उमेदवारांपैकी सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे १८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीसाठी मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यु काळे यांनी पत्रपरिषदेत दिली.निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये मधुकर कुकडे (राष्ट्रवादी काँग्रेस), हेमंतकुमार पटले (भाजप) अक्षय पांडे (विदर्भ माझा पार्टी), गोपाल उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) डॉ.चंद्रमणी कांबळे (डॉ.आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया), जितेंद्र राऊत (अखिल भारतीय मानवता पक्ष), धर्मराज भलावी (बहुजन मुक्ती पार्टी), नंदलाल काडगाये (बळीराजा पार्टी), राजेश बोरकर (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), अॅड.लटारी मडावी (भारीप बहुजन महासंघ), अजाबलाल तुलाराम (अपक्ष), किशोर पंचभाई (ट्रॅक्टर) काशिराम गजबे (अपक्ष), चनिराम मेश्राम (अपक्ष), पुरूषोत्तम कांबळे (अपक्ष), राकेश टेंभरे (अपक्ष), रामविलास मस्करे (अपक्ष), सुहास फुंडे (अपक्ष) हे उमेदवार रिंगणात आहेत.यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे म्हणाले, मतदार जागृती मोहीम राबविण्यात येणार असून जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे, यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होणार असून या मशिनविषयी नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी महत्त्वाचे चौक, बाजाराचे ठिकाणी व अन्य ठिकाणी व्हीव्हीपॅटचे सादरीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक असे सात ठिकाणी मॉडेल मतदान केंद्र तयार करण्यात येणार असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विलास ठाकरे हे उपस्थित होते.
१८ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:33 PM
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज सोमवारला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वैध २४ उमेदवारांपैकी सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे १८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
ठळक मुद्देलोकसभा पोटनिवडणूक : मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत