पाच विभागांच्या कामांमध्ये समन्वय : ४५३ टीएमसी पाण्याची होणार साठवणूक, ११६ हेक्टरमध्ये होणार कामे करडी (पालोरा) : सन २०१७-१८ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेतून पालोरातील जलसंसाधने मजबूत करण्यासाठी १८३.३ लाखांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. योजनेतून सुमारे ११६ हेक्टर आर क्षेत्रावर ५१ कामे होणार असून ४५३.५ टिसीएम पाणी साठवणुकीचा अंदाज विभागांच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. भात खचऱ्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. जलयुक्त शिवार शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतून जलसंसाधनाच्या कामांना बळकट करुन कायमस्वरुपी पाण्याचे स्त्रोत नव्याने तयार करण्याचा उद्देश आहे. सन २०१७-१८ वर्षात मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत सात गावांची निवड करण्यात आली. यात पालोरा, खडकी, बोंडे, डोंगरदेव, जांभळापाणी, नवेगाव, उसरीपार आदी गावांचा समावेश आहे. एकूण सहा विभाग या योजनेत काम करणार आहेत. यामध्ये कृषी, महात्मा फुले आंबेडकर शैक्षणिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान हरसुल ता. दिग्रस, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग, वनविभाग आदी प्रमुख विभागांचा समावेश आहे.पालोरा गाव कोरडवाहू क्षेत्रात मोडत असून शेतीला दुष्काळाचा सामना करावा लागतो. वारंवार शेतीचे नुकसान होत असल्याने वैफल्यग्रस्त स्थिती या भागाची आहे. तलाव उथळ असून साठवण क्षमता बेताची आहे. नाल्यांची स्थिती कमजोर असून गाळ मोठ्या प्रमाणात साचून असल्याने पाण्याचा साठा उपलब्ध होत नाही. शेतीची दुरावस्था आहे. बांधबंधारे नादुरुस्त असल्याने दुरुस्त्या तसेच नविन बंधाऱ्यांची आवश्यकता आहे. याच बाबींना समोर ठेवून जलयुक्त शिवार योजनेत जलसंसाधनांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. कृषी विभाग, मोहाडीपालोरा गावात कृषी विभाग मोहाडीमार्फत तालुका कृषी अधिकारी किशोर पाथरीकर, मंडळ कृषी अधिकारी राहुल गायकवाड, कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार व कृषी सहायक निखारे यांच्या मार्गदर्शनात व देखरेखीत एक भातखचरे ४.३८ हेक्टर आर क्षेत्रात (तीन लाख), भातखचरे पुनर्जिवनाची तीन कामे ३१.८३ हेक्टर आर क्षेत्रात (१५ लाख), दोन सिमेंट नाले बंधारे (२० लाख), सिमेंट नाला बांध दुरुस्ती तीन कामे (सहा लाख), नाला खोलीकरण आठ कामे (२४ लाख) आदी ३६.२१ हेक्टर आर क्षेत्रावर ६८ लाखांची १७ कामे होणार आहेत. या माध्यमातून १९३.६२ टिसीएम पाण्याचा साठा तयार करण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाचे वतीने भात खचऱ्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला असून सुमारे १०० मजुरांना रोजगार देण्याचा लक्षांक निर्धारित करण्यात आला आहे.अशासकीय संस्था, दिग्रसमहात्मा फुले, आंबेडकर, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान हरसुल ता. दिग्रस (अशासकीय संस्था) यांच्या माध्यमातून भात खचऱ्यांचे एक काम (दोन लाख), भात खचरे पुनर्जिवन २१.९५ हेक्टर आर क्षेत्रावर तीन कामे (चार लाख), एक सिमेंट नाला बांध (१० लाख), एक लाखा खोलीकरण (तीन लाख) आदी ३१.३३ हेक्टर आर क्षेत्रावर १९ लाखांची सहा कामे होवून ८७.९९ टिसीएम पाण्याचा साठा निर्माण होण्यास मदत होईल.लघु पाटबंधारे व ग्रामपंचायतग्रामपंचायत (पंचायत समिती) स्तरावर भात खचरे पुनर्जिवनाची ११ कामे (४.०८ लाख) होवून १३.७४ टिसीएम पाणी साठविला जाईल. जि.प. लघु पाटबंधारे विभागाचे वतीने ६०.९९ लाखांची चार मामा तलाव दुरूस्ती व खोलीकरणाची कामे होतील. यातून सुमारे १२५ टिसीएम पाणी साठविला जाईल.वनविभाग तुमसरवनविभागाच्या वतीने पाणी साठवण तलाव तीन कामे (सहा लाख), डिपसिसीटी आठ कामे (५.२० लाख), तलाव खोलीकरण, पाझर तलाव दोन कामे (२० लाख) आदी ४० हेक्टर आर क्षेत्रावर ३१.२० लाखांची १३ कामे होवून ३३.२० टीसीएम पाण्याचा साठा होईल. ही कामे होणार असून भविष्यात या परिसरात जलसाठा वाढेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. (वार्ताहर)वनीकरण व जलसंधारण विभागाचा नाकर्तेपणापालोरा गावात पाच तलाव असून त्यांचे गेट व लहान कालवे नादुरुस्त आहे. लिकेजमुळे जानेवारीतच तलावात पाण्याचा ठणठणाट असतो. कालवे निकामी असल्याने पाणी नाल्यांना वाहून जाते. एकसारख्या उंचीच्या व रुंदीच्या नाहीत. कुठे खोलगट तर कुठे उंच आहेत. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा साठा झाल्यास पाळ फुटण्याचा धोका संभवतो. पालोरा गावाशेजारील परिसर वृक्षांविणा ओसाड आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. सामाजिक वनीकरण व जलसंधारण विभागाला कामे करण्यास संधी असतांना या दोन्ही विभागांनी दुर्लक्ष केले आहे. अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे एकही काम गावात नाही. त्यामुळे गावाचे नुकसान झाले आहे. जलसंधारणांच्या कामामुळे कोरडवाहू पालोरा गावातील पाण्याचा दुष्काळ कमी होण्यास मदत होईल. शेतीची उपयोगिता व उत्पादन क्षमता वाढेल. भुगर्भात पाण्याची पातळी तसेच विहिरींत पाण्याचा साठा वाढेल. नाल्यांचे खोलीकरण झाल्याने शेतीला पाण्याचा उपयोग होईल. -निमचंद्र चांदेवार,कृषी पर्यवेक्षक करडी.
पालोऱ्यात १८३ लाखांचा ‘जलयुक्त शिवार’
By admin | Published: April 19, 2017 12:29 AM