शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

रोहयो अंतर्गत१९ हजार ४७९ कुटुंबाना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:24 AM

गत अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील मजुरांना मजुरीकाम व विविध विकसकांच्या निर्मितीसाठी शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत कोट्यवधींची राशी उपलब्ध केली ...

गत अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील मजुरांना मजुरीकाम व विविध विकसकांच्या निर्मितीसाठी शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत कोट्यवधींची राशी उपलब्ध केली जात आहे. सदर राशीनुसार रोजगार हमी योजनेअंतर्गत दरवर्षी ग्रामीण भागात कुशल तथा अकुशल कामे केली जात आहेत. अकुशल कामाअंतर्गत भातखचरे, नाला सरळीकरण, तलावाचे खोलीकरण यासह अन्य मजुरी कामे उपलब्ध केले जात आहेत; तर कुशल कामाअंतर्गत सिंचन विहिरींची निर्मिती, घरकुल आवास योजनेअंतर्गत स्वच्छतागृहाचे निर्माण, सिमेंट रोड, पाळीव प्राण्यांसाठी गोठा, आदी विविध विकासकामांचे निर्माण केले जात आहेत.

गतवर्षी शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण १९ हजार ४७९ कुटुंबांतील व्यक्तींद्वारा जवळपास ५.४ लाख मनुष्य दिवस काम केले गेले आहे. त्या अंतर्गत शासनाद्वारे ९८३.४८ करोड रुपये मजुरी मजुरांना दिली आहे. शासनाच्या मग्रारोहयो योजनेअंतर्गत सन २०२० - २०२१ मध्ये तालुक्यातील ३६४.३३ कोटी रुपयांचे कुशल कामांची निर्मिती करण्यात आली. सदर कामांमध्ये गावातील सिमेंट रोड, स्वच्छतागृह, पाळीव प्राण्यांसाठी गोठे बांधकाम, सिंचन विहीर यांसह अन्य निर्माण कामांचा समावेश आहे.

एकूणच शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागातील पर्याप्त संख्येत कुशल व अकुशल काम केले जात असल्याने तालुक्यातील नागरिकांत आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

बॉक्स

लाखांदूर पंचायत समिती जिल्ह्यात तिसऱ्या स्थानी

शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत गत काही वर्षांपासून ग्रामीण भागात नियमितपणे करण्यात येत असलेल्या कुशल व अकुशल कामांअंतर्गत लाखांदूर पंचायत समिती जिल्ह्यात तिसऱ्या स्थानावर असल्याची माहिती लाखांदूर पंचायत समितीचे बीडीओ जी. पी. अगर्ते यांनी दिली आहे.